Naga Chaitanya's wife Sobhita Dhulipala shared Video : शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाला आज ४ डिसेंबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पारंपारिक तेलुगु विधींनुसार या जोडप्याने लग्नगाठ बांधली. या खास प्रसंगाचे औचित्य साधून शोभिता हिने त्यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
समांथाच्या फोटोनंतर शोभिता म्हणते... मी त्याच्याशिवाय अपूर्ण! (Naga Chaitanya's wife Sobhita Dhulipala's first wedding anniversary)
१ डिसेंबर २०२५ रोजी समांथा रुथ प्रभू हिने निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरू याच्याशी लग्न केले. ३ डिसेंबर रोजी तिने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला. त्यादरम्यान आज ४ डिसेंबर २०२५ रोजी शोभिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. वर्षभरापूर्वी शोभिताला नागा चैतन्यशी लग्न केल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. समांथा आणि नागाच्या घटस्फोटासाठी शोभिताला जबाबदार धरलं जात होतं. दरम्यान समांथाने राजसोबत लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर तिलाही चाहत्यांचा रोष सहन करावा लागला. राज आणि श्यामली डे यांच्यातील घटस्फोटासाठी समांथाला जबाबदार धरलं गेलं.
नक्की वाचा - Samantha Marriage : समांथानेच नागा चैतन्यला धोका दिला? राजसोबत सिक्रेट लग्नानंतर अभिनेत्रीवर चाहते संतापले!
शोभिताची पोस्ट
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने शोभिताने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत लग्नातील अनेक सुंदर क्षण टिपण्यात आले आहेत. ज्यात हळदी समारंभाचाही समावेश आहे. तिने व्हिडिओला कॅप्शन दिलंय. "वारा नेहमीच घराच्या दिशेने वाहतो. सूर्याच्या दिशेने जाण्याच्या रोमांचक प्रवासात माझ्यासोबत जी व्यक्ती आहे तो माझा पती. नागा चैतन्य याने शोभिताच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलंय, "माय लव्ह, तुझ्या प्रवासात भाग होता आलं याचा आनंद आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा."
त्याच्याशिवाय मी अपूर्ण...
लग्नाच्या व्हिडिओमध्ये शोभिता म्हणते, मला असं वाटतं की, एखादी व्यक्ती अपूर्ण असते आणि कोणी येऊन तिला पूर्ण करतो. आपण स्वत: आपल्यात पूर्ण आहोत, मात्र तरीही त्याच्याशिवाय मी पूर्ण होऊ शकत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
