Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Wedding: अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya and Sobhita Dhulipala wedding) गेल्या काही दिवसांपासून कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहेत. सध्या त्यांच्या विवाहसोहळ्यासंबंधीच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. हे जोडपे येत्या 4 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. शोभिता (Sobhita Dhulipala) आणि नागा चैतन्यच्या (Naga Chaitanya) विवाहसोहळ्याची जोरदार तयार सुरू आहे. शोभिता आणि नागा चैतन्यने साखरपुडा पार पडेपर्यंत त्यांचे नाते गुप्त ठेवले होते. या दोघांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला. शोभिता आणि नागा चैतन्यचा 8 ऑगस्टला साखरपुडा पार पडला. आता त्यांचे लग्नापूर्वीच्या विधी देखील सुरू झाल्या आहेत. शोभिता आणि नागा चैतन्यचा लग्नसोहळा विधीवत पार पडणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आठ तास चालणार विवाहसोहळा
रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाहसोहळा पूर्णतः विधीवत पार पडणार आहे. तेलुगू ब्राह्मण परंपरांनुसार त्यांच्या विवाहसोहळ्या विधी पूर्ण आठ तास चालणार आहेत.
(नक्की वाचा: ब्लॅकमेलिंग, ड्रग्ज आणि डिव्होर्स! समंथावरील खळबळजनक आरोपानंतर मंत्री म्हणाल्या...)
शोभिताचे पोशाख कसा असेल?
रिपोर्ट्सनुसार, विवाहसमारंभाकरिता शोभिताचे आउटफिट तयार झाले आहे. शोभिता लग्नासाठी कांजीवरम साडी नेसणार आहे, ज्यावर खऱ्या सोन्याने नक्षीकाम करण्यात आले आहे. नागा चैतन्य देखील शोभिताच्या पोशाखाशी मॅचिंग असे आउटफिट परिधान करणार आहे. नवविवाहित वधू-वराच्या रुपामध्ये या जोडप्याला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. दरम्यान नागा चैतन्य आणि शोभिताचा साखरपुडा साध्या पद्धतीने घरच्याघरीच पार पडला होता.
(नक्की वाचा: समंथाच्या Ex Husbandने या हिरोईनशी केला साखरपुडा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world