Who is Sara Arjun's Father: भारतीय चित्रपटसृष्टीतील बालकलाकार म्हणून घराघरात पोहोचलेली सारा अर्जुन आता मुख्य अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवत आहे. सारा अभिनेता रणवीर सिंहसोबत 'धुरंधर' सिनेमात झळकली आहे. सारा आणि रणवीर यांच्या वयात जवळपास 20 वर्षांचा फरक आहे. सारा अर्जुन ही एक उत्तम अभिनेत्री आहे, पण फार कमी लोकांना माहिती असेल की, अभिनयाचा हा वारसा तिला तिच्या वडील राज अर्जुन यांच्याकडून मिळाला आहे.
कोण आहेत राज अर्जुन?
राज अर्जुन हे बॉलिवूड तसेच साऊथ सिनेमातील तमिळ, मल्याळम आणि तेलुगू भाषांमधील अनुभवी अभिनेते आहेत. राज अर्जुन यांनी 2002 मध्ये अजय देवगणसोबत 'कंपनी' या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. त्यांना खरी ओळख 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ब्लॅक फ्रायडे' चित्रपटामुळे मिळाली, ज्यात त्यांनी अक्रमची भूमिका साकारली होती.
शाहरुख खानसोबत 'रईस'मध्ये त्यांनी इलियासची, तर 'सीक्रेट सुपरस्टार'मध्ये त्यांनी फारुखची नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या सोबतच त्यांनी 'डी', 'कालो', 'थांडवम', 'राऊडी राठोड', 'सत्याग्रह', 'श्री', 'थलाइवा', 'ट्रॅफिक', 'डिअर कॉमरेड' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. भलेही राज यांनी मुख्य भूमिका केली नसेल, पण त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे.
सारा अर्जुनचे अभिनय क्षेत्रातील पाऊल
सारा अर्जुनने देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात आपले यश सिद्ध केले. साराने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. याशिवाय, ती सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटामध्ये एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world