जाहिरात
This Article is From Jul 30, 2024

शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला जाणार; किंग खानला नेमकं झालंय काय?

शाहरुख खानच्या डोळ्यावर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र आता शाहरुख चांगल्या उपचारासाठी अमेरिकेला गेला आहे.

शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला जाणार; किंग खानला नेमकं झालंय काय?
शाहरुख खान की आंख में आई दिक्कत

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. शाहरुख खानच्या डोळ्यांना समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उपचारासाठी किंग खान अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जाणार आहे.  शाहरुख खानच्या डोळ्यावर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र हवेतसे उपचार न झाल्याने आता शाहरुख चांगल्या उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहे.

शाहरुख खान डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी न्यूयॉर्कला जात असल्याची माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तीने एनडीटीव्हीला दिली. इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही. शाहरुख खान आणि त्याच्या टीमकडून कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला देखील आयपीएलदरम्यान शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आलंं होतं. शाहरुख खानला आयपीएल सामन्यादरम्यान उष्माघाताच्या त्रासामुळे अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून प्रकृती बरी झाल्यानंतर शाहरुखने आयपीएल फायनलमध्ये भाग घेतला. या सामन्यात विजय मिळवून शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं.