shatrughan sinha khamosh trademark : मुंबई उच्च न्यायालयाने दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, त्यांचा गाजलेला 'खामोश' हा शब्द आणि त्यांची ओळख पूर्णपणे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावाचा, फोटोचा किंवा संवादांचा व्यावसायिक वापर करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.
परवानगीशिवाय खामोश शब्द वापरता येणार नाही...
शत्रुघ्न सिन्हा यांनी खामोश प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १६ फेब्रुवारी रोजी शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की, सिन्हा यांची संवाद फेकीची शैली आणि विशेषतः 'खामोश' हा शब्द त्यांच्या सिनेमॅटिक ओळखीशी जोडलेला आहे.
नक्की वाचा - 'अरे मुंबईत राहतो..', रोहित शर्मा मराठीत बोलला; 'हास्यजत्रा'चे कलाकार भारावले
न्यायालयाचे आदेश...
त्यामुळे उच्च न्यायालयाने विविध वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आदेश दिले आहेत की, सिन्हा यांच्या संमतीशिवाय त्यांचा वापर करून तयार करण्यात आलेला मजकूर त्वरित हटवण्यात यावा. तसेच भविष्यात असा कोणताही मजकूर अपलोड करण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की, सध्याच्या डिजिटल युगात सेलिब्रिटींच्या ओळखीचा चुकीचा वापर वाढला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे एखाद्याचे नाव, आवाज किंवा शैली वापरून बनावट गोष्टी तयार केल्या जात आहेत, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world