जाहिरात

Shilpa Shetty Yoga Pose Video: शिल्पा शेट्टीचे हे आवडतं आसन सर्व ताण पटकन करेल दूर, पाहा VIDEO

Shilpa Shetty Yoga Pose Video: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तणाव दूर करण्यासाठी आणि स्नायू मजबूत करण्यासाठी एका खास आसनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Shilpa Shetty Yoga Pose Video: शिल्पा शेट्टीचे हे आवडतं आसन सर्व ताण पटकन करेल दूर, पाहा VIDEO
Shilpa Shetty Yoga Pose Video: तणाव दूर करण्यासाठी शिल्पा शेट्टीने दिली खास टीप
Shilpa Shetty Instagram

Shilpa Shetty Yoga Pose Video: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी वयाच्या पन्नाशीमध्येही पंचविशीतील तरुणीप्रमाणे दिसते. वयाच्या 50व्या वर्षातही तिचे फिटनेस आश्चर्यचकीत करणारे आहे. फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो शेअर करुन लोकांना निरोगी आरोग्याबाबत जागरुक करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर योगासनाचा व्हिडीओ शेअर केलाय, या आसनाचा सराव केल्यास तणाव कमी होण्यासह पायांचे स्नायू मजबूत होतील. या आसनामुळे शरीराची ताकद वाढते, शरीर लवचिक होते आणि मानसिक आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते.

तणाव दूर करण्यासाठी शिल्पा शेट्टीने दिल्या टिप्स  

धावपळीच्या युगात आणि कामाच्या ताणामुळे बहुतांश लोक मानसिक तणावाचा सामना करतात, वेळीच उपाय न केल्यास कित्येक गंभीर आजार उद्भवू शकतात. तुम्ही देखील कामाच्या तणावामुळे त्रस्त असाल तर शिल्पा शेट्टीने सांगितलेल्या योगासनाचा सराव करणं फायदेशीर ठरेल. 

शिल्पा शेट्टीने सांगितलं की, या योगासनामुळे कंबर, पाय आणि मांड्यांच्या भागातील स्नायूमधील ताण कमी होण्यास मदत मिळेल तसेच शरीर लवचिकही होईल, एकाग्रता वाढेल. पाय, गुडघे आणि ओटीपोटाच्या भागातील स्नायूही मजबूत होतील. याव्यतिरिक्त मन आणि शरीर यांच्यातील समन्वय सुधारते. नियमित आसनाचा सराव केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. 

शिल्पा शेट्टीने केले आवाहन

शिल्पा शेट्टीने चाहत्यांना आवाहन केलंय, आसनाचा सराव करताना सावधगिरी बाळगा. पाठ आणि गुडघ्यांची समस्या असल्यास सराव करू नये. 

Feeling Sleepy After Meals: जेवल्यानंतर झोप का येते? सुस्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय

(नक्की वाचा: Feeling Sleepy After Meals: जेवल्यानंतर झोप का येते? सुस्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com