जाहिरात

Shivali Parab Video : शिवाली परबचा तो व्हिडीओ पाहून रितेश देशमुखला लागलं वेड, म्हणाला...

Shivali Parab Instagram Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब आणि कॉरिओग्राफर रुपेश बने यांचा तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

Shivali Parab Video : शिवाली परबचा तो व्हिडीओ पाहून रितेश देशमुखला लागलं वेड, म्हणाला...
"Shivali Parab Video: अभिनेत्री शिवाली परबचा तो व्हिडीओ प्रचंड होतोय व्हायरल"
Riteish Deshmukh And Shivali Parab

Shivali Parab Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब आणि कॉरिओग्राफर-अभिनेता रुपेश बने पुन्हा एकदा चर्चेत आहेत. शिवाली आणि रुपेशने एक सुंदर रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडीओमध्ये या दोघांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त दिसतेय की केवळ चाहत्यांनाच नव्हे तर अभिनेता आणि निर्माता रितेश देशमुखलाही वेड अक्षरशः वेड लागलंय. शिवाली परब आणि रुपेश बनेनं रितेश देशमुखचा सुपरहिट सिनेमा 'वेड' सिनेमातील गाण्यावर रोमँटिक डान्स शुट केलाय. काही तासांतच हा व्हिडीओ 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय. रितेश देशमुखनेही शिवाली-रुपेशचं कौतुक करत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांचा व्हिडीओ शेअर केलाय. 

रितेश देशमुखने नेमके काय म्हटलंय?

वेड सिनेमातील गाजलेल्या गाण्यावर शिवाली-रुपेशने रोमँटिक व्हिडीओ शेअर केलाय, जो चाहत्यांना प्रचंड आवडतोय. दोघांच्या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. "तुम्ही दोघं खूप जबरदस्त आहात" या कॅप्शनसह रितेश देशमुखने त्यांचा व्हिडीओ शेअर केलाय. कौतुकाची थाप दिल्याबाबत दोघांनीही रितेश देशमुखचे आभार मानले आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Riteish Deshmukh Instagram

दरम्यान शिवाली आणि रुपेशने यापूर्वीही अनेक गाण्यांवर रोमँटिक व्हिडीओ शुट केले आहेत. तेही चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Shivali Parab Instagram

(नक्की वाचा: Shivali Parab News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब या स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये? नेटकऱ्यांचा प्रश्न)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rupesh Bane Instagram

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या गाण्याने प्रेक्षकांना लावलं होते वेड

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड सिनेमा 2022 साली बॉक्सऑफिसवर रिलीज झाला होता. मराठी प्रेक्षकांकडून या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. रिपोर्ट्सनुसार 'वेड' हा 2022मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. या सिनेमाच्या निमित्ताने रितेश-जिनिलिया ही जोडी पहिल्यांदाच मराठी सिनेमामध्ये झळकली. तेलुगू सिनेमा 'माजिली'चा हा रीमेक सिनेमा होता.  

Shivali Parab Video: Ritiesh Deshmukh Reacts To Actor's Latest Instagram Reel; Here's What He Said | Marathi Entertainment News

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com