
मराठी अभिनेत्री श्वेता मेहेंदळेने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात श्वेता मेहेंदळे यांची कार थांबवली म्हणून त्यांनी ऑन ड्युटी पोलिसाल सुनावलं. कोणत्याही कारणाशिवाय त्यांनी आमचा वेळ वाया घालवण्याचा अधिकार आहे का? हा छळ आहे. सर्व कायद्यांचे पालन करून आणि आमचे सर्व कर भरून एक नागरिक म्हणून आपल्याला आपले जीवन शांततेने जगण्याचा अधिकार नाही, असं श्वेताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
घडलेल्या प्रकाराबद्दल श्वेता मेहेंदळ यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं की, "ही घटना सकाळी 8 वाजताची आहे.आम्हाला थांबल्यानंतर ते (पोलीस) आम्हाला का थांबवले आहे किंवा कोणत्याही प्रकारचा संवाद न करता मागे गाडीपाशी जाऊन थांबून काहीतरी करत होते. माझ्या गाडीला डॅशकॅम असल्याने वेगाचे किंवा कोणत्याही ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन केले नाही याचे सर्व रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे."
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
"कोणत्याही प्रकारच्या नियमाचे उल्लंघन केले नसताना त्यांना आम्ही "साहेब" कशा करता थांबवले आहे? अशी विचारणा केली. तर त्यावर कोणतेही उत्तर देत नव्हते. शेवटी आम्ही गाडीतून उतरलो आणि विचारले तरी आम्हाला ऐकू येणार नाही एवढ्या हळू आवाजात काहीतरी बोलत होते. शेवटी आम्ही ठणकाहून विचारले तेव्हा "काय फाइन आहे का ते बघतोय" असं ते म्हणाले", असं श्वेता मेहेंदळेने सांगितलं.
"त्यानंतर मी काहीतरी अयोग्य मनसूबा असू शकतो. म्हणून रेकॉर्ड करायला सुरवात केली. आपल्याकडून आधार कार्ड, लिंक्ड फोन नंबर सगळे घेतल्याशिवाय गाडी रजिस्टर होत नाही. मी जर फाइन भरले नसतील तर त्यांच्याकडे सर्व प्रकारची यंत्रणा आहे. त्यामुळे असे अघळ पघळ कारण देऊन गाडी थांबवून सामान्य लोकांना त्रास देणे योग्य नाही. म्हणून निदान प्रश्न उपस्थित करण्याचा सामान्य माणसाला अधिकार असावा असे मला वाटते", असं श्वेताने म्हटलं.
(नक्की वाचा- संपूर्ण सिनेमा पाहिला मग केली तक्रार, INOX-PVR ला द्यावे लागले 65 हजार रुपये; काय आहे प्रकरण? )
नेटिझन्सने केले ट्रोल
श्वेताच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी तिलाच ट्रोल केले. गाडी तपासणे पोलिसांचे काम आहे. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं लोकांनी म्हटलं. एका युजरने म्हटलं की, "पोलीस थांबवू शकतात, चेकिंग करू शकतात. बाकी तुम्ही taxes वैगरे बोलता ते बरोबर आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी taxes भरावे लागतात तरी योग्य सुविधा मिळत नाहीत."
आणखी एका युजरने म्हटलं की, "गाडी चेक करणे हा पोलिसांचा अधिकार आहे. गाडीवरचा ऑनलाईन दंड चेक करावा लागतो, तो वसूल करूनही घ्यावा लागतो. बाकी टॅक्स वगैरेच्या बाबतीत तुम्ही बोलला तर योग्य आहे. त्याचा आणि या थांबवण्याचा दुरान्वयही संबंध नाही."
(नक्की वाचा- Chhaava Video: 'छावा' पाहताना चवताळला, तरुणाने असं केलं की थेट जेलमध्ये गेला... पाहा VIDEO)
दुसऱ्या एकाने लिहिलं की, "हे मराठी ॲक्टर फालतू स्टंट करत असतात. एरवी कधी हे बोलणार नाहीत. फक्त यांना फालतू नाटक करण्यात इंटरेस्ट जास्त असतो." आणखी एकाने म्हटलं की, "मॅडम तुमची पण चुकी आहे. तुम्ही अजूनही सीट बेल्ट लावलेला नाही. दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपल्याही चुका बघा." काही युजर्सनी श्वेताची बाजू घेत पोलीस नाहक त्रास देत असल्याचं म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world