जाहिरात

Shyam Benegal : श्याम बेनेगलांच्या या चित्रपटासाठी एकत्र आले होते 5 लाख शेतकरी, दोन-दोन रुपये देऊन तयार झाला सिनेमा!

Shyam Benegal passed away : गुजरातच्या पार्श्वभूमीवर तयार झालेला हा चित्रपट देशातील पहिला क्राउडफंडिंग चित्रपट होता.

Shyam Benegal : श्याम बेनेगलांच्या या चित्रपटासाठी एकत्र आले होते 5 लाख शेतकरी, दोन-दोन रुपये देऊन तयार झाला सिनेमा!
मुंबई:

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि समांतर सिनेमा चळवळीचे आघाडीचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं आज वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या चित्रपटांनी आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 

Shyam Benegal passed away : समांतर सिनेमा चळवळीतले आघाडीचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन

नक्की वाचा - Shyam Benegal passed away : समांतर सिनेमा चळवळीतले आघाडीचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन

श्याम बेनेगल यांचा मंथन चित्रपट देशातील प्रसिद्ध दुग्धक्रांतीवर आधारित आहे. ज्याची सुरुवात वर्गीस कुरियन यांनी केली होती. त्यांना देशातील श्वेत क्रांतीचं जनक म्हणून ओळखलं जातं. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाची निर्मिती कोणी मोठ्या, श्रीमंत प्रॉडक्शन हाऊसने नव्हे तर पाच लाख डेअरी शेतकऱ्यांनी केली होती. हे शेतकरी गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाशी संबंधित होते. 

गुजरातच्या पार्श्वभूमीवर तयार झालेला हा चित्रपट देशातील पहिला क्राउडफंडिंग चित्रपट आहे. ज्यासाठी देशभरातील पाच लाख शेतकऱ्यांना दोन दोन रुपये जमा केले होते. विजय तेंडुलकर यांच्यासोबत स्वत: वर्गीस कुरियन यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंथन चित्रपटाला 1977 मध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यातील एक बेस्ट फीचर फिल्म आणि दुसरं स्क्रीनप्लेसाठी होतं. स्क्रीनप्लेसाठीचा पुरस्कार विजय तेंडुलकरांना मिळाला होता. 1976 मध्ये भारताकडून हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. आता हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवलं जाणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी नसीरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांचे कुटुंबदेखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय चित्रपटाचे निर्माते आणि चित्रपट हेरिटेज फाऊंडेशनचे शिवेंद्र सिंह डुंगरपूरदेखील तेथे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: