
Prateik Babbar Marriage : स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर 14 फेब्रुवारीला प्रेयसी प्रिया बॅनर्जीसोबत (Prateik Babbar and Priya Banerjee Marriage) विवाह बंधनात अजकला. मात्र त्याने आपल्या लग्नात कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आमंत्रण दिलं नव्हतं. प्रतीकचे आई स्मिता पाटील हिच्या घरात सप्तपदी घेतल्या. त्यामुळे प्रतीकच्या लग्नानंतर त्यांच्या कुटुंबात फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान प्रतीक बब्बर याचा सावत्र भाऊ आर्यने प्रतिक्रिया दिली आहे. लग्नात वडील राज बब्बर यांना न बोलावल्याने त्याला खूप वाईट वाटल्याचं त्याने म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आर्य बब्बरने प्रतीकच्या लग्नावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कदाचित कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही कमी पडलो आहे. प्रतीकने त्याच्या लग्नासाठी मला, माझी आई, माझी बहीण यांना बोलावलं नव्हतं ते ठीक होतं. मात्र त्याने आपल्या वडिलांना बोलावलं नाही. तो असं कसं करू शकतो? वडिलांना याचा खूप त्रास झाला. वडिलांना लग्नात न बोलावल्याने आई दिवंगत स्मिता पाटील यांना दु:ख झालं असेल असंही ते यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - Poonam Pandey Video : पुनम पांडेच्या अश्लील व्हिडीओबद्दल आई काय म्हणाली? VIDEO व्हायरल
सावत्र भाऊ प्रतीकसोबतच्या नात्याबाबत आर्य म्हणाला, बब्बर कुटुंबामध्ये प्रतीकला कधीच सावत्रपणाची वागणूक दिली नाही. प्रतीकसाठी आमच्या घराचे आणि मनाची दारं कायम खुली आहेत. तो लग्नानंतर आपल्या आयुष्यात आनंदी राहावा यासाठी मी शुभेच्छा दोतो.
प्रेमाच्या दिवशी दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात..
प्रतीक बब्बर 14 फेब्रुवारी 2025 ला गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. यापूर्वी प्रतीकने निर्माती सान्या सागर हिच्याशी लग्न केलं होतं. सान्या सागर ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनऊची. तिने लंडनच्या चित्रपट अकादमीतून चित्रपट निर्मितीची डिप्लोमा केला. तिने गोल्डस्मिथ, युनिवर्सिटी ऑफ लंडनमधून चित्रपट निर्मितीमध्ये MA चं शिक्षण घेतलं. प्रतीकसोबत लग्न केल्याच्या वर्षभरातच दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world