जाहिरात
This Article is From May 14, 2024

कार्तिकी गायकवाड- रोनित झाले आईबाबा, गायिकेच्या घरी चिमुकल्याचे आगमन

Kartiki Gaikwad: प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व रोनित पिसे आईबाबा झाले आहेत. ही आनंदाची बातमी कार्तिकीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कार्तिकी गायकवाड- रोनित झाले आईबाबा, गायिकेच्या घरी चिमुकल्याचे आगमन

Kartiki Gaikwad: सारेगमप लिटिल चॅम्प्स या रिअ‍ॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाची विजेती आणि गायिका कार्तिकी गायकवाडच्या (Kartiki Gaikwad) घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. कार्तिकीने मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत तिने ही गोड बातमी शेअर केली आहे.   

(नक्की वाचा: सिगारेट ओढायचे बॉलिवूड अभिनेत्रीला होते व्यसन, एका आनंदाच्या बातमीमुळे कायमची सुटली सवय)
 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Kartiki Kalyanji Gaikwad - Pise Instagram

वर्ष 2008मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या छोट्या पडद्यावरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून कार्तिकी (Kartiki Gaikwad) घराघरामध्ये पोहोचली. मराठी कलाविश्वामध्ये पदार्पण करून तिने असंख्य गाणी गायली आहेत. तिच्या गाण्यांना रसिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Kartiki Kalyanji Gaikwad - Pise Instagram

(नक्की वाचा: हे बेबी फेम क्युट Angel 17 वर्षांनंतर दिसते अशी, गालावरच्या खळीवर चाहते फिदा)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Kartiki Kalyanji Gaikwad - Pise Instagram

29 मार्च 2024 रोजी कार्तिकीने डोहाळे जेवणाचे सुंदर-सुंदर फोटो- व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. अतिशय भव्यदिव्य अशा ओटी भरणीच्या कार्यक्रमाची झलक तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती.

(नक्की वाचा: सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?)

वर्ष 2020मध्ये कार्तिकी गायकवाडने रोनित पिसे यांच्याशी विवाह केला व लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी आणि रोनित आईबाबा झाले आहेत. 

ओटी भरणी कार्यक्रमाचा व्हिडीओ 

कार्तिकी गायकवाडचे डोहाळे जेवण

 VIDEO: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: