Smriti Mandhana's Wedding Postponed: क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. गोष्टी इतक्या अनपेक्षितपणे घडल्या की चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसलाय. 20 नोव्हेंबरपासून पलाश-स्मृतीच्या लग्नाची धामधूम सुरू होती.
23 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न होणार होतं, पण...
संगीत कार्यक्रमादरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. वडिलांच्या अतिशय जवळ असणाऱ्या स्मृतीने लग्नसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी काय म्हटलं?
डॉक्टर नमन शाह यांनी सांगितलं की, "स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना छातीमध्ये डाव्या बाजूला वेदना होऊ लागल्या, यानंतर हृदयविकाराची लक्षणं दिसू लागली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. त्यांचे कार्डिअॅक एंझाइमचे प्रमाण वाढले असले तरीही त्यांना देखरेखीअंतर्गत ठेवणे आवश्यक आहे. आमच्या कार्डिओलॉजिस्टनंही त्यांच्या आरोग्याची तपासणी केलीय".
पलाशलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं
स्मृतीच्या वडिलांनंतर पलाशलाही काही काळासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पलाशच्या आईने मीडियाशी बातचित करताना सांगितलं की, पलाश तणावामध्ये होता आणि आता तो मुंबईत परतलाय. रिपोर्टनुसार पलाशला मुंबईतील गोरेगाव परिसरातील SVR हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार कॉन्सर्ट आणि लग्नसोहळ्यामुळे सतत झालेल्या प्रवासामुळे पलाशवर ताण आला, याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर झाला.
स्मृती मानधनाने डिलिट केले फोटो
हैराण करणारी बाब म्हणजे स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लग्नाशी संबंधित फोटो डिलिट केले. इतकंच नाही तर लग्नाची घोषणा करणारा तसेच स्टेडिअममधील प्रपोजलचा व्हिडीओ देखील हटवला. स्मृतीच्या या कृतीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं.
(नक्की वाचा: Smriti Mandhana News: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न कधी होणार? नणंदेने मौन सोडत इन्स्टा पोस्ट केली शेअर PHOTO)
पलाशची बहीण पलकने सोडलं मौनदुसरीकडे "स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे स्मृती आणि पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आलाय", अशी माहिती पलक मुच्छलने सोशल मीडियाद्वारे दिली.
(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्नापूर्वी नवा ट्विस्ट, स्मृती मानधनाला पलाश मुच्छलने फसवलं? दुसऱ्या बाईसोबतचं चॅटिंग Viral)
यादरम्यानच पलाश मु्च्छलचे एका महिलेसोबतेच चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चॅट्स व्हायरल करणाऱ्या महिलेने तसा दावा केलाय, संबंधित सोशल मीडिया अकाउंट यानंतर डिअॅक्टिव्हॅट करण्यात आलंय. या नव्या अफवांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

