
Actress Kim Sae Ron death : साऊथ कोरियातील प्रसिद्ध अभिनेत्री किम से रॉन तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. अवघ्या 24 वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्यमुळे साऊथ कोरिया सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सेओंगडोंग पोलीस स्टेशनच्या माहितीनुसार, एका ओळखीच्या व्यक्तीने किमचा शोध घेतल्यानंतर संध्याकाळी 4.50 वाजता इमर्जन्सी सर्व्हिसला फोन करुन तिच्या घरी बोलावलं. पोलिसांनी सांगितले की घटनास्थळी कोणताही गैरप्रकार किंवा चोरीचा कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता. यामुळे अधिकाऱ्यांना खात्री पटली की कोणतीही गुन्हेगारी घटना नाही. परंतु मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(नक्की वाचा - Poonam Pandey Video : पुनम पांडेच्या अश्लील व्हिडीओबद्दल आई काय म्हणाली? VIDEO व्हायरल )
किम से रॉनच्या कारने मे 2022 मध्ये, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला धडक दिली होता. त्यावेळी तिच्यावर दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि अटकही करण्यात आली होती. ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यावेळी तिचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आला.
(नक्की वाचा: Mumbai News: 'आपणच आपली ठासून घेतो...', मराठी अभिनेता भयंकर संतापला; VIDEO व्हायरल)
अभिनेत्रीने तेव्हा लिखीत माफी मागून नुकसान भरपाईही दिली होती. किम से रॉनची आर्थिक परिस्थिती देखील मधल्या काळात बिघडली होती. त्यावेळी ती उदरनिर्वाहासाठी पार्ट टाईम नोकरी देखील करत होती. किमने एप्रिल 2024 मध्ये थिएटर अभिनयाकडे परतण्याचा प्रयत्न केला, परंतु विवाद आणि आरोग्याच्या कारणांमुळे तिला बाहेर पडावे लागले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये किमने गिटार मॅन नावाचा नवीन चित्रपट साईन केल्याची बातमी आली होती. मात्र त्यात नंतर काही अपडेट आली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world