Sunjay Kapur Property Row : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवरून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे.
राणी कपूर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सूनबाई प्रिया सचदेव-कपूर यांनी संजय कपूर यांच्या खऱ्या संपत्तीची आणि मालमत्तेची माहिती न्यायालयापासून लपवून ठेवली आहे. हा 'संपत्तीचा मोठा गैरव्यवहार' (Massive Concealment) असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काय केले आरोप?
राणी कपूर यांच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील वैभव गग्गर यांनी न्यायालयात सांगितले की,संजय कपूर यांचे वार्षिक वेतन तब्बल 60 कोटी (60 Crore) रुपये इतके होते. मात्र,आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या बँक खात्यात केवळ 2 कोटी (2 Crore) रुपयांपेक्षा कमी रक्कम आढळली आहे. त्यांच्याकडे सुमारे 1.69 कोटी (1.69 Crore) किमतीची क्रिप्टो मालमत्ता असल्याचेही समोर आले.
( नक्की वाचा : Sunjay Kapur Will Dispute: संजय कपूर यांच्या मृत्युपत्रावर मोठे प्रश्नचिन्ह! साक्षीदाराने जबाब बदलल्याने पेच )
प्रिया कपूर यांनी संपत्तीचे तपशील न्यायालयापासून जाणूनबुजून लपवले असून, हा पैसा परदेशात हलवण्यात आला असावा, असा दाट संशय गग्गर यांनी व्यक्त केला आहे.
राणी कपूर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की,"राजोकरी येथील फार्महाऊस माझ्या दिवंगत पतीने बांधले आहे. तिथे 50 पेक्षा जास्त कलाकृती होत्या, त्या कुठे आहेत? संजय कपूरकडे जीवन विमा (life insurance) नव्हता, भाड्याने येणारे उत्पन्न (rental income) नव्हते, म्युच्युअल फंड्स नव्हते? 60 कोटी रुपये पगार असताना खात्यात फक्त 1.7 कोटी रुपये कसे असू शकतात?"
( नक्की वाचा : ‘मी भीक मागणारी नाही!' Sunjay Kapur मृत्युपत्रावर Exucutor श्रद्धा सुरी यांचा कोर्टात पलटवार, म्हणाल्या... )
गग्गर यांनी न्यायालयाला विनंती केली की, प्रिया कपूर आणि संजय कपूर यांच्या गेल्या 2 वर्षांतील सर्व मालमत्तांचा तपशील सादर करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच, निधी परदेशात हलवल्याच्या संशयामुळे, 'जैसे थे' (status quo ante) स्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश द्यावा.
राणी कपूर यांना मृत्यूपत्रात स्थान नाही
राणी कपूर आणि त्यांच्या पतीने मिळून कंपनी उभी केली होती. पतीने त्यांची संपूर्ण मालमत्ता राणी कपूर यांच्या नावावर केली होती. मात्र, संजय कपूर यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रात (Will) आईचा साधा उल्लेखही नसल्याचे वकिलांनी सांगितले. "80 वर्षांच्या वृद्धेला आज सांगितले जाते की मृत्यूपत्रात तिचे नाव नाही," असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
करिश्मा कपूरच्या दाव्याला पाठिंबा
संजय कपूर यांच्या मृत्यूपत्रावरून वाद सुरू असून, राणी कपूर यांनी संजय कपूर यांची पहिली पत्नी करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिच्या दाव्याला पाठिंबा दर्शवला आहे. प्रिया कपूर यांनी सादर केलेले मृत्यूपत्र बनावट (not genuine) असल्याचा दावा करिश्मा कपूरने केला आहे.
दोन लग्नांमधील फरक
प्रिया कपूर यांच्या वकिलांनी 'पतीची मालमत्ता पत्नीला देणे ही कपूर कुटुंबाची परंपरा' असल्याचे म्हटले होते. यावर गग्गर यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, "दोन लग्नांची तुलना कशी करता येईल? प्रिया कपूर यांचे संजय यांच्याशी 7 वर्षे लग्न टिकले. हे त्यांचे तिसरे आणि प्रिया यांचे दुसरे लग्न होते. मी माझ्या पतीसोबत 40 वर्षे संसार केला. आमचे मृत्यूपत्र नोंदणीकृत होते आणि साक्षीदार 30 वर्षांपासून ओळखीचा होता. येथील साक्षीदार 2022 पूर्वी कंपनीशी संबंधित नव्हता."
सोना कॉमस्टार कंपनीवर नियंत्रणाचा प्रयत्न
संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर प्रिया कपूर यांनी 'सोना कॉमस्टार' (Sona Comstar) कंपनी आणि मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोपही राणी कपूर यांच्या वकिलांनी केला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 डिसेंबर (3 December) रोजी होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world