जाहिरात

Jason Sanjay: थलपती विजय यांचा फॅन अन् मुलाला केलं किडनॅप! त्या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Thalapathy Vijay Son: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय यांचा मुलगा जेसन संजय याच्या एका व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Jason Sanjay: थलपती विजय यांचा फॅन अन् मुलाला केलं किडनॅप! त्या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
"Thalapathy Vijay Son: तमिळनाडूचे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा व्हायरल व्हिडीओ"

Thalapathy Vijay Son:  तमिळनाडूचे मुख्यमंत्री चंद्रशेखरन जोसेफ विजय (Thalapathy Vijay) सातत्याने कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या या नवीन इनिंगची सर्वत्र चर्चा होत आहे, पण यादरम्यान त्यांचा मुलगा जेसन संजय (Jason Sanjay) देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. खरं तर अलीकडेच 'जलाटा इंडिया'ने जेसनचा एक व्हिडीओ शेअर केला होता, जो आता डिलीट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला असून विजय यांच्या एका चाहत्याने त्याला किडनॅप केले होते,असाही दावा त्याने केला आहे. जेसनने सांगितले की, विजय यांचा तो चाहता अभिनेत्याला भेटण्यासाठी इतका उत्सुक होता की, त्याने त्यांच्या मुलाला शाळेतून उचलले आणि सोबत घेऊन गेला. जेसनला वाटले की त्याचे अपहरण होत आहे आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा विजय यांची गाडी आली तेव्हा त्या व्यक्तीने त्याला सुरक्षितपणे मागच्या सीटवर बसवले.

25 वर्षांचा आहे जेसन विजय

25 वर्षीय जेसन आपल्या वडिलांप्रमाणेच अभिनयात पाऊल ठेवेल अशी चाहत्यांना आशा होती. पण त्याने कॅमेऱ्यामागचे जग निवडले. चेन्नईच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेसन परदेशात गेला आणि तिथे त्याने फिल्ममेकिंग - स्क्रीनरायटिंगचे शिक्षण घेतले. आता तो दिग्दर्शक (Director) म्हणून आपली नवी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्याचा 'सिग्मा' (Sigma) हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे, ज्याचे पोस्टर खूप व्हायरल झाले होते.

चेन्नईच्या मोठ्या शाळेत झाले शिक्षण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेसन संजयने आपले प्राथमिक शिक्षण चेन्नईच्या 'अमेरिकन इंटरनॅशनल स्कूल'मधून (American International School) पूर्ण केले होते. ही शाळा शहरातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळांपैकी एक मानली जाते. शाळेच्या दिवसांपासूनच जेसनला सिनेमा, कॅमेरा आणि स्टोरीटेलिंगमध्ये आवड होती. स्टार किड असूनही तो नेहमी प्रसिद्धीझोतापासून (लाइमलाइट) थोडा दूरच राहिला.

(नक्की वाचा : लेकानं मुस्लीम हीरोइनशी लग्न करण्यावर दारा सिंग यांचं काय म्हणणं होतं? विंदू दारा सिंगचा खळबळजनक खुलासा)

कॅनडा आणि लंडनमध्ये शिकला फिल्ममेकिंग

शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेसन परदेशात गेला. त्याने कॅनडाच्या 'टोरॅन्टो फिल्म स्कुल'मधून (Toronto Film School) फिल्म प्रोडक्शनचा कोर्स केला. यानंतर तो लंडनला पोहोचला आणि तिथे 'सेंट्रल फिल्म स्कूल'मधून (Central Film School) स्क्रीनरायटिंगचे शिक्षण घेतले. जेसनने अभिनयाऐवजी दिग्दर्शन आणि पटकथा लेखनात अधिक रस दाखवला. यामुळेच त्याने सिनेमांच्या क्रीएटिव्ह भागावर अधिक लक्ष केंद्रित केले.

(नक्की वाचा : Sensorineural Hearing Loss Symptoms: Alka Yagnik यांना 'या' गंभीर आजारानं ग्रासलं, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय)

लहानपणी सिनेमातही झळकला होता 

खूप कमी लोकांना माहिती आहे की, जेसन संजय लहानपणी थलपती विजय यांच्या 'वेट्टाइकारन' (Vettaikaaran) या सिनेमातील एका गाण्यात दिसला होता. यानंतर अनेकदा त्याच्या अभिनयातील पदार्पणाच्या बातम्या समोर आल्या होत्या, पण त्याने कॅमेऱ्यामागे काम करणे अधिक पसंत केले. आता जेसन एक दिग्दर्शक म्हणून काय नवीन कमाल दाखवतो, याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com