Ashok Saraf Comeback On Television: हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते अशी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची ओळख आहे. अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज झाले आहेत. "येतोय महाराष्ट्राचा महानायक लवकरच", असे म्हणत त्यांच्या नवीन मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज करून प्रेक्षकांना खास सरप्राइज देण्यात आले. 'अशोक मा.मा.' या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.
प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचे वाटत आहे. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशी त्यांची भूमिका दिसत आहे. तसेच 'शिस्त म्हणजे शिस्त' हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचे प्रोमोद्वारे स्पष्ट होत आहे. पण मिश्किल अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये 'अशोक मा.मा.' असे लिहिलेले दिसत आहे.
(नक्की वाचा: Bigg Boss 18 : हिंदी बिग बॉसच्या 18व्या सीझनची प्रतीक्षा संपली, या दिवशी होणार ग्रँड प्रीमिअर)
अशोक सराफ यांच्या नव्या मालिकेमध्ये नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याव्यतिरिक्त अशोक सराफ यांच्यासह आणखी कोणकोणते कलाकार मालिकेत पाहायला मिळणार आहेत? मालिका कोणत्या तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
(नक्की वाचा: Aishwarya Rai Video: ऐश्वर्या राय वयाच्या 80व्या वर्षी दिसेल अशी! चेहऱ्यावर सुरकुत्या तरीही म्हणाल सुंदरी जणू)
'अशोक मा.मा.' मालिकेबाबत अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली की, "मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकर याने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. 'टन टना टन' या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल"
(नक्की वाचा: 'द लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा ट्वीट करत इशारा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world