जाहिरात

Bigg Boss 18 Promo : हिंदी बिग बॉसच्या 18व्या सीझनची प्रतीक्षा संपली, या दिवशी होणार ग्रँड प्रीमिअर

 Bigg Boss 18 : हिंदी बिग बॉसचा 18वा सीझन ऑक्टोबर महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जाणून घ्या तारीख...

Bigg Boss 18 Promo : हिंदी बिग बॉसच्या 18व्या सीझनची प्रतीक्षा संपली, या दिवशी होणार ग्रँड प्रीमिअर

Bigg Boss 18 Promo Out : बिग बॉस प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदी 'बिग बॉसचा 18'वा सीझन ऑक्टोबर महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 6 ऑक्टोबर रात्री 9 वाजता या सीझनचा ग्रँड प्रीमिअर पार पडणार आहे. 'बिग बॉस 18'चा (Bigg Boss 18) जबरदस्त प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान (Salman Khan Bigg Boss 18) नव्या तसेच हटके अंदाजात दिसत आहे. बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये काय पाहायला मिळणार आहे आणि घरातील सदस्यांसोबत नेमके काय-काय होणार? याबाबतची माहिती सलमानने व्हिडीओमध्ये दिली आहे. बिग बॉसच्या नवीन सीझनचे थीम वेळेशी संबंधित असणार आहे.  

बिग बॉस 18मध्ये हे कलाकार दिसण्याची शक्यता (Bigg Boss 18 Contestants List)

रिपोर्टनुसार, ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील शहजादा धामी, नायरा बॅनर्जी, चाहत पांडे आणि अविनाश मिश्रा 'बिग बॉस 18'मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 14'च्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला स्पर्धक करण वीर मेहरा यालाही शोमध्ये एण्ट्री मिळाली आहे. या पाच स्पर्धकांनी करारावर स्वाक्षरी केल्याचे म्हटले जात आहे.  

याशिवाय दलजीत कौर, शोएब इब्राहिम, दिग्विजय सिंह राठी, समीरा रेड्डी, मॅक्सटर्न, पूरव झा, पूजा शर्मा, डॉली चायवाला, शीजान खान, दीपिका आर्या, नुसरत जहां, एलीस कौशिक, हर्ष बेनिवाल, करण पटेल, ईशा कोपीकर आणि सुरभी ज्योती या कलाकारांच्या नावाचीही चर्चा आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: