बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागत आहे. एका लग्नसमारंभात स्टेजवर बोलताना विकीने लग्नावर केलेल्या एका जुन्या पठडीतील जोकमुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं असून, त्याच्या या विधानाला 'अपमानजनक' ठरवलं आहे. एका लग्नसमारंभातील विकीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने लग्नानंतरच्या आयुष्यावर केलेला विनोद नेटकऱ्यांना अजिबात आवडलेला नाही.
नक्की काय म्हणाला विकी कौशल?
व्हायरल व्हिडिओमध्ये विकी आपल्या प्रसिद्ध चित्रपटातील डायलॉग विचारतो, "हाउज द जोश?" यावर उपस्थितांनी "हाय सर" असे उत्तर दिले. त्यानंतर हसत हसत विकी म्हणाला, "मी पाहिलंय की बॅचलर्सचा जोश नेहमी हाय असतो. आमच्यासारख्या विवाहित लोकांचा जोश वर्षागणिक कमी होत जातो. पुढे नवरदेवाला उद्देशून विकीने म्हटलं, पण काळजी करू नकोस, 4 दिवसांत जोश कमी होत नाही."
विकीच्या जोकवर नेटकऱ्यांचा संताप
विकीचा हा जोक ऐकून तिथे उपस्थित लोक हसले असले तरी, इंटरनेटवर मात्र त्याचे पडसाद उमटले आहेत. विशेषतः रेडिट (Reddit) आणि इन्स्टाग्रामवर युजर्सनी त्याला चांगलेच सुनावले आहे. "2026 मध्येही लग्नाबद्दल असे जोक करणे चुकीचे आहे. हे विनोद 2016 मध्ये कपिल शर्माच्या शोमध्येच सोडून द्यायला हवे होते," अशी टीका एका युजरने केली.
Vicky is turning into the wife jokes guy
by u/yours_truly_Davina in BollyBlindsNGossip
(नक्की वाचा- 'Dhurandhar' Trailer: धुरंधर सिनेमातील 'या' कलाकाराची वाढली डोकेदुखी; रोज मिळत आहेत धमक्या)
"जर हेच विधान रणबीर कपूरने केले असते, तर आतापर्यंत त्याच्यावर हजारो रिल्स आणि पॉडकास्ट बनले असते, पण विकीला लोक सोडून देत आहेत," असा संतापही एकाने व्यक्त केला. "सार्वजनिक ठिकाणी आपल्या लग्नाची चेष्टा करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्नीचा अपमान करणे आहे. विकी आता 'ग्रीन फ्लॅग' उरला नसून 'रेड फ्लॅग' बनत चालला आहे," अशी प्रतिक्रिया एका महिला युजरने दिली.
विकीचे आगामी प्रोजेक्ट्स
विकी कौशल सध्या त्याच्या करिअरच्या सुवर्णकाळात आहे. गेल्या वर्षी आलेल्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. सध्या तो संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या बिग बजेट चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world