आई पंजाबी, भाऊ मुसलमान,वडील ख्रिश्चन आणि बायको हिंदू! कोण आहे स्वतःला सेक्युलर म्हणणारा हा अभिनेता

या अभिनेत्याचा एक नवा चित्रपट येऊ घातला असून यात त्याने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याच्यावर टीका होऊ लागली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

एका अभिनेत्यावर तो कडवट हिंदुत्ववादी असल्याची टीका होऊ लागली. उत्तम अभिनयाद्वारे बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात या अभिनेत्याला यश आले. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मोठ्या पडद्यावर  साकारताना त्याने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. या भूमिकेसासाठी या अभिनेत्याला फिल्मफेअर क्रिटिक्स अॅवॉर्डही देण्यात आले. अशा या अभिनेत्याचा एक नवा चित्रपट येऊ घातला असून यात त्याने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. 'हिंदुतत्ववादी सरकारला खूश करण्यासाठी हे करतोय का?' असे प्रश्न त्याला विचारले जाऊ लागले. या प्रश्नांना या अभिनेत्याने सणसणीत उत्तर दिले आहे.

नक्की वाचा : अभिषेक बच्चनसोबत अफेअरची चर्चा, निमरत कौरने कन्फर्म केले तिचे रिलेशनशिप स्टेटस; म्हणाली...

विक्रांत मास्से असं या अभिनेत्याचे नाव असून 'द साबरमती रिपोर्ट '  हा त्याचा नवा चित्रपट येऊ घातला आहे. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या विक्रांतने आता भाजप सरकारला खूश करण्याचे उद्योग सुरू केलेत अशी त्याच्यावर टीका केली जाऊ लागली. एका मुलाखतीमध्ये विक्रांतने या टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलं. त्याने त्याच्या घरचे उदाहरण देत सांगितलं की त्याच्या घरातूनच धर्मनिरपेक्षतेचे उदाहरण दिले जाते.

नक्की वाचा: 38 वर्षांच्या अभिनेत्रीनं 49 वर्षांच्या 'बाबा' शी केलं दुसरं लग्न, Photo Viral

विक्रांतने एका मुलाखतीमध्ये त्याच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना म्हटले की, 'माझ्याकडे पाहिल्यानंतर मी धर्मनिरपेक्ष वाटत नाही का?' धर्मनिरपेक्ष व्यक्ती ही देखील  जाती,धर्माच्या पलिकडे जात एखादी बाजू घेऊन बोलू शकते.  मी आजही धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी आहे. सगळ्यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहणे हे माझ्या दृष्टीने धर्मनिरपेक्षपणा आहे. एक-मेकांच्या संस्कृतीचा मान राखणे, आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगतानाच दुसऱ्याला त्याच्या संस्कृतीवरून न हिणवणे हे देखील धर्मनिरपक्षेक्षपणाचे लक्षण आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहोत हे सांगणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नसते असे विक्रांतने म्हटले.

नक्की वाचा : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण

याच मुलाखतीत विक्रांतने त्याच्या घरचे उदाहरण देताना सांगितले की, माझ्या आई-वडिलांचे लग्न आंतरधर्मीय आहे. माझे वडील हे खिस्ती असून माझी आई ही पंजाबी आहे. माझ्या भावाने धर्मपरिवर्तन केले असून त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. माझी बायको ही हिंदू आहे आणि माझ्या मुलाचे नाव मी वरदान ठेवले आहे. माझे वडील जरी ख्रिस्ती असले तरी त्यांनी 6 वेळा वैष्णोदेवीची वारी केली आहे. भाऊ मुसलमान असला तरी तो लक्ष्मीची पूजा करतो. आम्ही सगळेजण एकत्र दिवाळी साजरी करतो आणि दिवाळीमध्ये बिर्याणी खातो असे विक्रांतने सांगितले आहे.    

Advertisement
Topics mentioned in this article