Viral Dance: परदेशी डान्सरला बॉलिवूडची भुरळ, पत्नीसोबत केला 'चुनरी चुनरी'गाण्यावर डान्स, नेटकरी म्हणाले हे तर.

त्याची पत्नी देखील या व्हिडिओमध्ये त्याला साथ देत असून दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • स्वीडनचा व्यावसायिक डान्सर कार्ल स्वानबर्ग आणि त्याच्या पत्नीने 'चुनरी चुनरी' गाण्यावर नृत्य केले
  • कार्लने गाण्यातील लाल दुपट्टा आणि सलमान खानच्या स्टेप्स हुबेहूब साकारल्या आहेत
  • या डान्समध्ये कार्लने लिप-सिंक आणि अभिनय हुबेहुब केलाय
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Swedish Man Chunari Chunari Dance: बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि सुष्मिता सेन यांच्या 'चुनरी चुनरी' या गाण्याची जादू आजही कायम आहे. नुकताच एका स्वीडिश डान्सरने या गाण्यावर आपल्या पत्नीसोबत समुद्रकिनारी असा काही डान्स केला आहे की, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कार्ल स्वानबर्ग असे या स्वीडिश तरुणाचे नाव असून, त्याने आपल्या बॉलीवूड प्रेमाने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. नेटकऱ्यांनी ही त्याच्या या डान्सला दाद दिली असून या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडला आहे. 

कार्ल स्वानबर्ग हा व्यावसायिक डान्सर असून त्याने स्वीडनमधील एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर हा व्हिडिओ शूट केला आहे. निळे आकाश आणि अथांग समुद्राच्या पार्श्वभूमीवर, काळ्या रंगाचा पोषाख आणि पांढऱ्या स्नीकर्समध्ये कार्ल अतिशय उत्साहात नाचताना दिसतोय. गाण्यातील 'चुनरी'ची थीम जपण्यासाठी त्याने हातात लाल रंगाचा दुपट्टा घेतला असून, सलमान खानच्या आयकॉनिक स्टेप्स त्याने हुबेहूब साकारल्या आहेत. परदेशात सलमानची आणि त्याच्या गाण्याची किती क्रेझ आहे हे ही या व्हिडीओ वरून समोर आले आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Neetu Kapoor: नीतू कपूर यांना लागलं होतं दारूचं व्यसन, पेग घेतल्या शिवाय लागत नव्हती झोप, काय होतं कारण?

व्हिडिओमध्ये कार्ल केवळ डान्स करत नाही, तर तो उत्तम लिप-सिंक आणि ड्रॅमॅटिक एक्सप्रेशन्स देतानाही दिसतोय. जुन्या हिंदी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या हालचाली आणि भाव असायचे, तसेच त्याने आपल्या डान्समध्ये उतरवले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना कार्लने कॅप्शनमध्ये "Bollywood nostalgia at its best" असे म्हटले आहे. त्याने हे देखील नमूद केले की, हा व्हिडिओ त्याने त्याच्या पत्नीसोबत मिळून तयार केला आहे. या गाण्यावर डान्स करताना आनंद मिळाल्याचं ही त्याने म्हटलं आहे. 

नक्की वाचा - विराट कोहली, प्रियांका चोप्रा, रोनाल्डोसह अनेक सेलिब्रेटींना दणका! इंस्टाग्राममुळे झाला जबरदस्त तोटा

सोशल मीडियावर हा व्हिडिओ येताच हजारो व्ह्यूज आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका विदेशी कलाकाराला भारतीय संस्कृती आणि बॉलिवूड गाण्यांवर इतके प्रेम करताना पाहून भारतीय चाहते आनंद व्यक्त करत आहेत. "बॉलिवूडची जादू सातासमुद्रापार पोहोचली आहे," अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. त्याने केलेला डान्स पाहिला तर  खुद्द सलमान खानलाही त्याचे कौतुक वाटेल. समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर लोकेशन्स आणि कार्लचा हटके अंदाज यामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर आग लावत आहे. परदेशी असूनही बॉलिवूडची आवड जोपासणाऱ्या कार्लने या व्हिडिओद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची पत्नी देखील या व्हिडिओमध्ये त्याला साथ देत असून दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

Advertisement