Asha Bhosle Funeral : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान त्यांच्या अंत्यदर्शनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी माध्यमांशी बोलताना अपडेट दिली.
आनंद भोसले यांनी सांगितलं की, आशा भोसलेंचं अंतिम दर्शन लोअर परेल स्थित त्यांच्या निवासस्थानी होईल. उद्या १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लोअर परेल स्थित कासा ग्रांडेमध्ये त्यांचं अंतिम दर्शन करता येईल. आशा भोसलेंवर शिवाजी पार्कात सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. .
आशा भोसले या त्यांच्या काळातील सर्वात प्रभावशाली गायिकांपैकी एक. आशा भोसले यांनी 1943 मध्ये "माझा बाळ" या मराठी चित्रपटासाठ पहिले पार्श्वगाणं गायलं. आशा भोसले यांनी संस्मरणीय गाण्यांना आवाज दिला आहे. "चुरा लिया है तुमने जो दिल को," "दो लफ्ज़ों की है दिल की कहानी," "क्या गज़ब करते हो जी," "ओ हसीना जुल्फों वाली जाने जहाँ," आणि "ये लडका है अल्लाह कैसा है दिवाना" ही त्यांची काही हिट गाणी. हिंदीशिवाय त्यांनी जवळपास 20 भारतीय आणि परदेशी भाषांमध्येही गाणी गायली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world