
Who is Archita Phukan: सध्या सोशल मीडियावर सध्या बेबीडॉल आर्ची हे नाव जोरदार चर्चेत आहे. आसाममधील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या तरुणीच्या एका रील आणि एका फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.अर्चिता फुकन असं या रीलस्टारचे नाव आहे. ती तिच्या बोल्ड आणि स्टायलिश कंटेंटसाठी ओळखली जाते आणि तिचे इंस्टाग्रामवर 750 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, पण , बेबीडॉल आर्ची अचानक इतकी व्हायरल का झाली? हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या...
Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मानं 63 दिवसांमध्ये कमी केलं 11 किलो वजन! काय आहे 21-21-21 नियम?
का चर्चेत आली बेबीडॉल आर्ची?
अर्चिता फुकनने सर्वातआधी 'डेम उन ग्रर' गाण्यावर एक जबरदस्त साडी ट्रान्सफॉर्मेशन रील शेअर केली, ज्याला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. या व्हिडिओमधील तिचा ग्लॅमरस अवतार आणि ट्रेंडी स्टाईल नेटकऱ्यांना प्रचंड आवडली. मात्र त्यानंतर अर्चिताचा एक फोटो व्हायरल झाला ज्यावरुन तिला जोरदार ट्रोल करण्यात आले.
बेबीडॉल आर्चीने अमेरिकन अॅडल्ट फिल्म स्टार केंद्रा लस्टसोबतचा एक फोटो व्हायरल झाला. या एका फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. तिच्या या फोटोमुळे अर्चिता फुकन इंडस्ट्री बदलणार आहे का? ती फक्त सोशल मीडिया स्टार आहे की आणखी काही? असे सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केले.

यावर , आर्चीने थेट उत्तर दिले नाही परंतु इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने "एक बैठक, एक फ्रेम, एक क्षण... आणि माझे नाव चर्चेमध्ये आहे. मी काहीही पुष्टी केलेली नाही किंवा नाकारलेले नाही. काही मार्ग खाजगी आहेत, काही पावले धोरणात्मक आहेत. प्रत्येक कथा अध्यायांमध्ये सांगितली जाते, कॅप्शनमध्ये नाही, असं मत व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टवरुनही उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
बेबीडॉल आर्ची AIची निर्मिती?
दुसरीकडे काही सोशल मीडिया युजर्सनी बेबीडॉल आर्ची ही खरी व्यक्ती नाही तर एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) ने तयार केलेली व्यक्तिरेखा आहे असा खळबळजनक दावा केला आहे. रेडिटसारख्या प्लॅटफॉर्मवरील युजर्स असा दावा करत आहेत की हा पूर्णपणे 'थर्स्ट ट्रॅप स्कॅम' आहे. बेबीडॉल आर्ची खरोखरच एक खरी व्यक्ती आहे की एआयचा चमत्कार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की ती सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world