जाहिरात

Kapil Sharma: कॉमेड‍ियन कपिल शर्मानं 63 दिवसांमध्ये कमी केलं 11 किलो वजन! काय आहे 21-21-21 नियम?

Kapil Sharma Weight loss Secret:  कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या फक्त त्यांच्या विनोदांसाठीच नव्हे, तर त्यांच्या फिटनेस बदलामुळेही खूप चर्चेत आहेत.

Kapil Sharma: कॉमेड‍ियन कपिल शर्मानं 63 दिवसांमध्ये कमी केलं 11 किलो वजन! काय आहे 21-21-21 नियम?
Kapil Sharma Weight loss Secret:  कपिल शर्मानं 63 दिवसांमध्ये 11 किलो वजन कमी केले आहे.
मुंबई:

Kapil Sharma Weight loss Secret:  कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या फक्त त्यांच्या विनोदांसाठीच नव्हे, तर त्यांच्या फिटनेस बदलामुळेही खूप चर्चेत आहेत. नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कपिलचा नवीन आणि बदललेला लुक समोर आल्यावर चाहते आणि फिटनेस तज्ज्ञही थक्क झाले. कपिलने हा बदल कसा केला? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. फिटनेस कोच योगेश भाटेजा आणि त्यांचा अत्यंत सोपा पण प्रभावी फिटनेस फॉर्म्युला शेअर केलाय. त्यांनी या फॉर्म्ुलाला 21-21-21 असं नाव दिलंय. भाटेजा यांनी एका यूट्यूब चॅनेलवर हा फॉर्म्युला शेअर केलाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

63 दिवसांमध्ये 11 किलो वजन कमी

कपिल शर्माने अवघ्या 63 दिवसांत 11 किलो वजन कमी केले. त्यासाठी त्यानं कोणतीही खडतर डाएट फॉलो केलं नाही किंवा तासन्तास जिममध्ये घाम गाळला नाही. त्यानं हळूृ-हळू पण दीर्घकाळ चालणारी पद्धत वापरली. त्यासाठी शरीर आणि मन दोन्ही बदलासाठी तयार केले. 

कपिलचे कोच योगेश भाटेजा यांनी सांगितलं की, बहुतेक जण टनेसची सुरुवात करतानाच हार मानतात कारण ते अचानक खूप जास्त प्रयत्न करतात. मग ते वर्कआउट असो किंवा डाएटिंग. यामुळे त्यांचे शरीर आणि मन दोन्ही लवकर थकून जाते. ते यामधून माघार घेतात. 

म्हणूनच त्यांनी कपिलसाठी असा फॉर्म्युला वापरला, ज्यात दर 21 दिवसांनी एक बदल होतो. अशा प्रकारे शरीराला हळूहळू फिट होण्यास मदत होते.

(नक्की वाचा : Scorpion Sting: विंचू चावला तर विष तातडीनं कसं उतरवणार? आयुर्वेदिक डॉक्टरांच्या टिप्स लक्षात ठेवा! )

काय आहे 21-21-21 नियम?

या नियमामध्ये एकूण 63 दिवस असतात. त्यांची विभागणी तीन टप्प्यांमध्ये केली आहे. प्रत्येक टप्पा हा 21 दिवसांचा असतो. 

पहिले 21 दिवस - हालचालीवर लक्ष केंद्रित करा

या टप्प्याची सुरुवात शरीराला सक्रिय करण्यापासून होते, ज्यात जिममध्ये जाण्याची गरज नसते. कोच योगेश म्हणतात, "या 21 दिवसांत फक्त शरीराची हलचाल करा. स्ट्रेचिंग, पीटी क्लाससारखे सोपे व्यायाम असतात. हवे तर जिलेबी खा, पण शरीराची रोज हालचाल करा. यामुळे तुमचे स्नायू सक्रिय होतात आणि शरीर वर्कआउटसाठी तयार होते." या टप्प्याचा उद्देश फक्त शरीराला चालण्याची सवय लावणे आहे, वजन कमी करणे नाही.

दुसरे 21 दिवस – आहारात हलका बदल

यानंतर खाण्यापिण्यावर लक्ष देण्याची वेळ येते. पण इथेही कोणतेही कठोर नियम नाहीत. भाटेजा म्हणतात, "आम्ही कपिलच्या आहारात कोणताही मोठा बदल केला नाही. कॅलरीज मोजल्या नाहीत, कार्ब्स कमी केले नाहीत. फक्त तो कधी काय खातो? हे पाहिलं  आणि थोडे संतुलन साधले."  या टप्प्यामध्ये आम्ही लोकांना खाण्यापासून घाबरण्याऐवजी खाण्याला समजून घेण्याचा सल्ला देतो.

तिसरे 21 दिवस – सवयींवर नियंत्रण

तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील 21 दिवस हे मानसिक आणि भावनिक तंदुरुस्तीसाठी आहेत. यामध्ये व्यक्ती त्याच्या वाईट सवयी ओळखतो आणि त्यापासून दूर राहायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ  सिगारेट, दारू किंवा गरजेपेक्षा जास्त कॅफीन. 

कोच भाटेजा यांनी सांगितले की, तुम्ही 42 व्या दिवसापर्यंत पोहोचता, तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये बदल झाल्याचे जाणवते. मग आणखी चांगले होण्याची इच्छा होते. हीच वेळ असते जेव्हा तुम्ही वाईट सवयी सोडण्याचा सर्वात खडर निर्णय घेऊ शकता.

हा मार्ग का प्रभावी आहे?
 'ही पद्धत विशेषतः नवशिक्यांसाठी सर्वात प्रभावी आहे. यामध्ये अचानक फिटनेसचा ताण येत नाही, ना मनावर भार पडतो. त्यांचे मत आहे की, ६३ दिवसांनंतर फिटनेसची इच्छा असलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रेरणाची गरज लागत नाही. तो आपल्या शरीरातील बदल पाहूनच प्रेरित होतो,' असा मंत भाटेजा यांनी व्यक्त केलं.


स्पष्टीकरण: या लेखातील संपूर्ण माहिती ही संबंधित तज्ज्ञाचं वैयक्तिक मत आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टराचा सल्ला घ्या. NDTV नेटवर्क यामधील परिणामांची कोणतीही जबाबदारी घेत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com