बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 5 ) चा पाचवा सीझन हा दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. आठवड्याचा शेवट आला की या शोच्या दर्शकांची संख्या बरीच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सरलेल्या आठवड्याबाबत बोलायचे झाल्यास सगळा फोकस हा निक्की तांबोळीवर (Nikki Tamboli) राहिल्याचे पाहायला मिळाले होते. निक्कीदर काही वाक्यांमागे 'बाई....' असं म्हणत असून तिचे डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi 5 : कोण कोणाला देणार नॉमिनेशन तोफेच्या तोंडी, अंकिता-निक्की तांबोळीमध्ये राडा
निक्की तांबोळीचा 'बाई….' हा शब्द गाण्यांमध्येही वापरला जाऊ लागला असून दही हंडीच्या कार्यक्रमात ही गाणी ऐकायला मिळत होती. निक्की तांबोळी, छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे आणि अरबाज पटेल यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खिळवून ठेवू लागली आहे. या अरबाज पटेलने 'भाऊचा धक्का' मध्ये आपली एक प्रेयसी असल्याचे सांगितले. प्रेयसी असतानाही आपल्याला निक्कीबद्दल त्याच्या मनात प्रेमाच्या भावना फुलल्या असल्याचे त्यानेआडून आडून सांगितले.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi 5: राडा मग अडवणूक... अन् अंकिता वालावलकरला कोसळलं रडू
अरबाजने केलेल्या या खुलाशानंतर सूत्रसंचालक असलेल्या रितेश देशमुख याने त्याला प्रश्न विचारला की तुझी प्रेयसी असतानाही निक्की आणि अभिजीत सावंत यांच्यातील मैत्रीचा इतका त्रास का होतोय? रितेशने अरबाजला विचारले की "गेल्या आठवड्यात तू शोमधून बाहेर पडण्याबाबत बोलत होता, याचा काय अर्थ आहे ? तू इतका प्रभावित का होतोय ? तुला कळत नाहीये की तू प्रभावित होतोयस मात्र हे दिसतंय की तू प्रभावित झालाय. " अरबाजला घरातील एकाही सदस्याने याबद्दल प्रश्न विचारला नसल्याबद्दलही रितेशने आश्चर्य व्यक्त केले. अरबाजने घरातील सगळ्या सदस्यांवर इतकं गारूड कसं काय निर्माण केलंय याचा आपल्या प्रश्न पडल्याचेही रितेशने म्हटले.
हे ही वाचा: बिग बॉसच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, निक्की तांबोळीला आवडू लागलाय हा सदस्य?
रितेशने अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांच्या खेळाची तारीफ केली. या दोघांनी त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्वाने प्रभावित केल्याचेही रितेशने म्हटले. या दोघांनी इतरांचे अनुकरण करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही असेही तो म्हणाला. अभिजीतने आपली भूमिका स्पष्टपणे मांडत निक्कीसोबतच्या त्याच्या मैत्रीकडे वेगळ्या नजरेने पाहू नये असेही अरबाजला सुनावले होते. याचाही उल्लेख रितेशने केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world