जाहिरात

कोण आहे बड्या बिझनेसमॅनची मुलगी नेत्रा, जिच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये पोहोचले ट्रम्पपुत्र आणि मोठ सेलिब्रिटी

Raju Ramalinga Mantena Daughter Wedding: रिपोर्ट्सनुसार या लग्न समारंभामध्ये संगीत जगतातील प्रसिद्ध नाव जेनिफर लोपेझ आणि दक्षिण आफ्रिकेतील डीजे- प्रोड्युसर ब्लॅक कॉफी देखील सहभागी होणार आहेत.

कोण आहे बड्या बिझनेसमॅनची मुलगी नेत्रा, जिच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये पोहोचले ट्रम्पपुत्र आणि मोठ सेलिब्रिटी
Raju Ramalinga Mantena Daughter Wedding: कोण आहे नेत्रा?
  • उदयपूरमध्ये राजू रामलिंगा मंटेना यांची मुलगी नेत्राचं लग्न 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे
  • शुक्रवार रात्री संगीत सोहळ्यात बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कित्येक सेलिब्रिटींनी सादरीकरण केलं
  • डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर गर्लफ्रेंडसह लग्नसोहळ्यात सहभागी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Raju Ramalinga Mantena Daughter Wedding: अमेरिकन उद्योगपती राजू रामलिंगा मंटेना यांची मुलगी नेत्रा हिचा ग्रँड विवाहसोहळा उदयपूर शहरामध्ये पार पडणार आहे. पाहुण्यांबाबत सांगायचे झाले तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गर्लफ्रेंडसह लग्नासोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. शुक्रवारी (21 नोव्हेंबर) रात्री सिटी पॅलेसच्या जनाना महल येथे पार पडलेल्या "म्युझिक नाइट" मध्ये भारतीय आणि परदेशी कलाकारांच्या सादरीकरणाने या हाय-प्रोफाइल सोहळ्यात अधिकच रंगतदार झाला. हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांचा समावेश असलेल्या या संगीतमय कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता, पण फार कमी लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.

रणवीर-जान्हवीचं लयभारी सादरीकरण

शुक्रवारी रात्री पार पडलेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमाचं होस्टिंग करण जोहर आणि सोफी चौधरीने केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर असलेल्या लोकांच्या मते रणवीर सिंगने उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरसह त्यांच्या गर्लफ्रेंडला डान्स फ्लोअरवर आणून डान्स करण्यास भाग पाडलं. कृती सॅननने तिचे हिट गाणे "परम सुंदरी" सादरीकरण केले, तर जॅकलिन फर्नांडिसने "लाल छडी" वर नृत्य केले. जान्हवी कपूरच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. लग्न व्यवस्थापन संस्थेच्या म्हणण्यानुसार, वरुण धवन आणि शाहिद कपूर यांनीही संगीत सोहळ्यामध्ये सादरीकरण केले.
 

Smriti Mandhana Video: लाल गुलाब, डायमंड रिंग... वर्ल्ड कप जिंकला त्याच डीवाय पाटील स्टेडिअममध्ये पलाशने स्मृती मानधनाला केलं प्रपोज

(नक्की वाचा: Smriti Mandhana Video: लाल गुलाब, डायमंड रिंग... वर्ल्ड कप जिंकला त्याच डीवाय पाटील स्टेडिअममध्ये पलाशने स्मृती मानधनाला केलं प्रपोज)

23 नोव्हेंबर रोजी नेत्राचा विवाहसोहळा पार पडणार

संगीत सोहळ्यामध्ये माधुरी दीक्षित यासारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या भव्यदिव्य विवाहसोहळ्याच्या तयारीत सहभागी असलेल्या लोकांच्या मते, जवळपास 600 पाहुण्यांमध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांचाही समावेश आहे. विवाह सोहळ्याशी संबंधित कार्यक्रम 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत असणार आहेत. हळदी समारंभ 22 नोव्हेंबर रोजी तर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी जगमंदिरात लग्न समारंभ पार पडेल, संध्याकाळी स्वागत समारंभ असेल. उदयपूर सिटी पॅलेसच्या माणक चौक आणि जनाना महलसह जगमंदिर आणि द लीला पॅलेस हॉटेलमध्ये  लग्नाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी लीला पॅलेस हॉटेल आकर्षक लाल थीममध्ये सजवण्यात आले आहे.

कोण आहे नेत्रा?

नेत्रा मंटेना ही अमेरिकन औषधांच्या क्षेत्रातील मोठे उद्योगपती राजू रामलिंग मंटेना आणि पद्मा मंटेना यांची मुलगी आहे. ती वामसी गडिराजूसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत असलेली नेत्रा मूळची दक्षिण भारतीय आहे. या लग्न समारंभाला अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com