जाहिरात

Shah Rukh Khan : शाहरूख खानवर तोंड लपवण्याची वेळ का आली ?

बॉलीवूडचे तीन खान एकत्र आले. आमीर खानच्या वाढदिवसाच्या (Aamir Khan Birthday) निमित्ताने हे तिघे एकत्र आले होते (Salman Khan Shah rukh khan and Aamir Khan comes together) असे सांगितले जाते. मात्र तिघे एकत्र येण्यामागचे खरे कारण अजून कळू शकलेलं नाही.

Shah Rukh Khan : शाहरूख खानवर तोंड लपवण्याची वेळ का आली ?
मुंबई:

सलमान खान, शाहरूख खान आणि आमीर खान या तिघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपापले साम्राज्य निर्माण केले आहे. हे तिघेजण एकत्र एका चित्रपटात कधीही दिसलेले नाहीत. यातल्या शाहरूख खान आणि सलमान खानची जोडी बरीच प्रसिद्ध झाली होती. तशीच सलमान खान आणि आमीर खानचीही जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली होती. मात्र तिघे एका चित्रपटात कधीही दिसलेले नाहीत. आमीर खान याचा 14 मार्च रोजी वाढदिवस असतो. (Aamir Khan Birthday Celebration) 12 मार्चला त्याच्या मुंबईतील घरी सलमान खान आणि आमीर खान पोहोचले होते. सलमान आणि शाहरूख खान हे दोघेजण आमीर खानच्या घरी त्याला वाढदिवसानिमित्ताने अगोदर शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते असे सांगितले जाते.  काहींनी दावा केला आहे की हे तिघेजण  इफ्तारनिमित्ताने एकत्र आले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आमीर खानला भेटून झाल्यानंतर सलमान खान निघाला तेव्हा तो लिफ्टने खाली आला होता. त्याने आपला चेहरा लवपण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. यामुळे पापाराझींना त्याची दृश्ये नीटपणे टीपता आली. त्याला खाली सोडण्यासाठी आलेल्या आमीर खाननेही आपला चेहरा लपवला नव्हता. मात्र शाहरूख खान खाली उतरला तेव्हा त्याने आपला चेहरा हुडीने पूर्णपणे झाकून घेतला होता. शाहरूख खानचे नखही दिसू नये यासाठी त्याच्यासोबतच्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. यातल्या दोघांनी छत्र्या उघडून शाहरूख खान अजिबात दिसणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली होती. 

नक्की वाचा : वयाच्या 60 व्या वर्षी आमिर खान लग्नबंधनात अडकणार? नवी गर्लफ्रेंड गौरी कोण आहे?

शाहरूख खानने आपला चेहरा का लपवला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाहरूख असं का वागतोय हे त्याच्या चाहत्यांना कळेनासे झाले आहे. ऐरवी शाहरूख खान असं कधी करत नाही, तो नियोजित कार्यक्रमांमध्ये कॅमेऱ्यांना बिनधास्तपणे सामोरा जात असतो. मात्र यावेळी त्याने आपला चेहरा का झाकला असावा असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. त्याने आपला चेहरा आमीर खानच्या सांगण्यावरूनच झाकल्याचे पुढे आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसते आहे की आमीर खानने त्याला उतरत असताना चेहरा पूर्णपणे झाकण्यास सांगितले होते. त्यानुसार शाहरूख खानने आपला चेहरा झाकून घेतला होता. 

नक्की वाचा : बंदूकधारी सुरक्षारक्षक आणि पोलीस फौजफाट्यासह सलमान-शाहरुख पोहोचले आमिर खानच्या घरी, पण का? 

जे तर्क लढवले जात आहे त्यानुसार शाहरूख खानने त्याचा आगामी चित्रपट 'किंग'साठीचा लूक जगाला कळू नये यासाठी ही काळजी घेतली असावी असे बोलले जात आहे. काहींचे म्हणणे आहे की शाहरूख खान, पापाराझींना आपला चेहरा दिसू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो.शाहरूखने नेमका आपला चेहरा का झाकला याचं उत्तर तोच नीटपणे देऊ शकेल. तीनही खान एकत्र आल्याने या तिघांनी मिळून एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे. आमीर खान एका चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून यामध्ये सलमान आणि शाहरूख खान एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. टायगर vs पठाण हा चित्रपट आमीर खान दिग्दर्शित करू शकेल असाही दावा केला जात आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: