जाहिरात

बंदूकधारी सुरक्षारक्षक आणि पोलीस फौजफाट्यासह सलमान-शाहरुख पोहोचले आमिर खानच्या घरी, पण का? Video

Bollywood News: सलमान खान आणि शाहरुख खान पोहोचले आमिर खानच्या घरी पाहा व्हिडीओ

बंदूकधारी सुरक्षारक्षक आणि पोलीस फौजफाट्यासह सलमान-शाहरुख पोहोचले आमिर खानच्या घरी, पण का? Video
सलमान खान आणि शाहरुख खान आमिरच्या घरी पोहोचले

Salman Khan & Shah Rukh Khan At Aamir Khan Home:  बॉलिवूडचे तीनही खान सध्या त्यांच्या भेटीमुळे चर्चेत आले आहेत. बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि बादशाह शाहरुख खानने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. सलमान खान आणि आमिर खान प्रचंड कडेकोट बंदोबस्तामध्ये आमिर खानच्या घरी पोहोचले होते.  बॉलिवूडमधील हे तीनही खान का भेटले? कोणत्या कारणासाठी भेटले? आमिर, सलमान, शाहरुख आगामी सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत? असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तिघांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 

(नक्की वाचा : Chhava : 'छावा' आता इंग्रजीतही, चित्रपटाच्या दमदार यशानंतर आली आणखी एक Good News)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Varinder Chawala

दरम्यान 14 मार्चला आमिर खानचा 60वा वाढदिवस आहे. आमिर खानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमान आणि शाहरुख त्याच्या घरी पोहोचल्याचंही म्हटलं जात आहे. दुसरीकडे पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार नाही, याची पुरेपूर काळजी शाहरुख खान आणि त्याच्या सुरक्षारक्षकांनी घेतली. शाहरुख खानने काळ्या रंगाचे हुडी घातले होते आणि त्याने स्वतःचा चेहरा पूर्णपणे झाकला होता.

निर्माते राजकुमार संतोषी यांनी देखील आमिर खानच्या घरी हजेरी लावली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच आमिर खानने ब्लॉकबस्टर 'डर' सिनेमा नाकारल्याचे सांगितले होते. 

आमिर खानने का नाकारले 'डर' सिनेमा

'डर' सिनेमा नाकारल्याचा पश्चाताप होतो का? असा प्रश्न आमिर खानला विचारला होता. यावर त्याने म्हटलं की, "डर सिनेमा जो मी करणार होतो, पण नंतर नाही केला. पण जे झाले ते योग्य झाले कारण जे सूर यशजी पकडत होते, ते शाहरुख खानसोबतच जुळून येत होते. त्यामुळे जर मी डर सिनेमा केला असता तर काही वेगळेच झाले असते. कारण मी या सिनेमाकडे वेगळ्या नजरेने पाहत होतो. मला पश्चाताप होत नाहीय कारण त्या सिनेमाची निर्मिती चांगली झाली आणि सिनेमा यशस्वी देखील झाला".

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: