![Aamir Khan : आमिर खान 59 व्या वर्षी तिसरं लग्न करणार? मिस्ट्री गर्ल आणि कुटुंबीयांची झाली भेट Aamir Khan : आमिर खान 59 व्या वर्षी तिसरं लग्न करणार? मिस्ट्री गर्ल आणि कुटुंबीयांची झाली भेट](https://c.ndtvimg.com/2025-02/ds9f4u0o_aamir_625x300_01_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
Aamir Khan News : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. याबाबतच्या वृत्तानुसार, अभिनेता बेंगळुरुमधील एका मिस्ट्री गर्लसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये आहे. अर्थात त्यानं याबाबत अजून अधिकृत काहीही सांगितले नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबतच्या रिपोर्टनुसार तिची आणि आमिरच्या कुटुंबीयांची देखील भेट झाली आहे. ही भेट खूप चांगली होती, असंही सांगण्यात येत आहे. त्या महिलेबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. आमिर खानचे यापूर्वी दोन लग्न झाले होते. त्याचं पहिलं लग्न 1986 साली रिना दत्तसोबत झालं होतं. त्यांना इरा खान आणि जुनैद खान ही दोन मुलं आहेत. त्यांचा 2002 साली घटस्फोट झाला होता.
( नक्की वाचा : Rakhi Sawant चं लग्न मोडलं, नियोजित वर म्हणाला, 'भावाशी लग्न लावून देतो', Video )
आमिरनं त्यानंतर 2005 साली चित्रपट निर्माता किरण रावबरोबर लग्न केलं. त्यांचा 2021 साली घटस्फोट झाला. त्या दोघांना आझाद हा एक मुलगा आहे. त्याचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. आमिर सध्या त्याचा मुलगा जुनैद खानच्या लवयापा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे.
आमिर खान यापूर्वी लाल सिंग चड्डा या सिनेमात दिसला होता. तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्या सिनेमातील अपयशानंतर आमिरनं अभिनयातून ब्रेक घेतला. तो सध्या सितारे जमीन पर या चित्रपटाची तयारी करत आहे, असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाबाबत फॅन्समध्ये मोठा उत्साह आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world