जाहिरात

Viral Post : धनश्री -युजवेंद्रच्या घटस्फोटाची चर्चा; लोकांनी 'धोकेबाज' म्हणत या अभिनेत्रीला केलं ट्रोल

सुरभीने लॉन्ग रिलेशनशिपनंतर 2024 मध्ये तिच्या प्रियकराशी लग्न केले आहे. सुरभीने आपल्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर तिला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. 

Viral Post : धनश्री -युजवेंद्रच्या घटस्फोटाची चर्चा; लोकांनी 'धोकेबाज' म्हणत या अभिनेत्रीला केलं ट्रोल

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. चहल आणि धनश्रीने याबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. यादरम्यान सोशल मीडियावर टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना ट्रोल झाली आहे. चहलच्या चाहत्यांना सुरभीला ट्रोल केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटांच्या चर्चेत सुरभीला ट्रोल का होतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. झालं असं की नेटिझन्स सुरभी आणि धनश्री यांच्यात संभ्रम झाला. सुरभी आणि धनश्री यांच्या दिसण्यात असलेल्या साम्यामुळे हा गोंधळ झाला. मात्र याचा मनस्थान सुरभीला सहन करावा लागला. 

सुरभीने लॉन्ग रिलेशनशिपनंतर 2024 मध्ये तिच्या प्रियकराशी लग्न केले आहे. सुरभीने आपल्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर तिला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. 

(नक्की वाचा-  Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? फोटो व्हायरल)

Latest and Breaking News on NDTV

एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "तू चहलचा विश्वासघात का केला?" आणखी एका युजरने लिहिलं की, "तू चहलपासून का वेगळी होत आहेस, दोघेही एकत्र चांगले दिसत आहात." दुसऱ्या युजरने लिहिले की, "तुम्ही तुमचेच घर उद्ध्वस्त करत आहात." मात्र, काही चाहत्यांनी अभिनेत्रीचा बचाव करत लिहिले की, "ती चहलची पत्नी नाही, लोक गैरसमज करत आहेत." तर एकाने गमतीत कमेंट करत म्हटलं की, "लोक फक्त कमेंट करत आहेत, नाव देखील वाचत नाहीत." 

(नक्की वाचा-  घटस्फोटाच्या चर्चेत Yuzvendra Chahal च्या पोस्टमधून भविष्याचे संकेत! म्हणाला, खरं असेल किंवा..)

काही चाहत्यांनी सुरभीला काही दिवस सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर न करण्याचा सल्लाही दिला. सुरभीने आपल्या करिअरमध्ये अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, लग्नानंतर ती अनेकदा तिचा पती करणसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: