जाहिरात

Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? फोटो व्हायरल

Yuzvendra Chahal with Mystery Girl : युजवेंद्र चहलसोबत दिसणारी ही तरुणी आरजे महवश आहे. फोटोत दिसत आहे की युजवेंद्र आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करतान दिसत आहे.

Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? फोटो व्हायरल

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटांच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. या चर्चांदरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जुयवेंद्र एका तरुणीसोबत दिसत आहे. त्यामुळे नेटिझन्स ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण याची चौकशी करताना दिसत आहेत.  युजवेंद्र चहल या तरुणीला डेट करतोय की काय? अशी चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु झाली आहे. ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे? याबाबत जाणून घेऊया.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

युजवेंद्र चहलसोबत दिसणारी ही तरुणी आरजे महवश आहे. फोटोत दिसत आहे की युजवेंद्र आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करतान दिसत आहे. त्याच्या बाजूला ही तरुणी बसलेली दिसत आहे. आरजे महवशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ख्रिसमस सेलिब्रेशनमधील हा फोटो आहे, असं तिच्या कॅप्शनमधून कळत आहे. 

(नक्की वाचा-  घटस्फोटाच्या चर्चेत Yuzvendra Chahal च्या पोस्टमधून भविष्याचे संकेत! म्हणाला, खरं असेल किंवा..)

कोण आहे आरजे महवश?

आरजे महवश ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. फॅशन व्लॉग, ट्रॅव्हल आणि फिटनेस व्हिडीओमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे प्रँक व्हिडीओ देखील सोशल मीडिआवर व्हायरल झाले आहेत. आरजे महवशचे इन्स्टाग्रावर जवळपास 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर यूट्युबवर तिचे 7.87 लाख सबस्क्रायबर्स आहेत. 

( नक्की वाचा : Yuzvendra Chahal च्या मनात काय सुरु आहे? घटस्फोटाच्या चर्चेत नव्या पोस्टचा अर्थ काय? )

अवघ्या 4 वर्षात चहल-धनश्रीमध्ये दुरावा?

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने 8 ऑगस्ट 2020 रोजी साखरपुड्याची घोषणा केली होती. चार महिन्यांनंतर म्हणजे 22 डिसेंबर 2020 रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली. पारंपरिक भारतीय रितीनुसार चहल आणि धनश्रीचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com