Chhatrapati Sambhajinagar News: नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस (TCS) प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणे एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलेच महागात पडले आहे. निदा खानला पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात प्रशासनाने कठोर पाऊल उचलत आज पहाटे मतीन पटेल याच्या घरावर बुलडोझर चालवला. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
NCP News: राजकारणातील मोठी बातमी! सुनिल तटकरे नाराज? घेतली शरद पवारांची भेट,चर्चा काय घडली?
मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर
मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय मिळवून देण्यात मतीन पटेल यांचा मोठा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. केवळ राहण्याची सोयच नव्हे, तर तपासापासून वाचण्यासाठी विविध स्तरावर मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पटेल यांना आधीच सहआरोपी केले असून, आता महापालिकेने त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरवला आहे.
आज सकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने बुलडोझर चालवला आहे. त्याचबरोबर निदा खान ज्या घरात ७ दिवस राहिली होती त्या घरावरही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईवेळी लोकांनी फुलांची उधळण केली असून आयुक्तांना हार घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
केवळ घरच नव्हे, तर मतीन पटेल याच्या नारेगाव परिसरातील कार्यालय आणि इतर मालमत्तांनाही महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. तीन दिवसांत खुलासा न केल्यास पुढील कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी केल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world