जाहिरात

NCP News: राजकारणातील मोठी बातमी! सुनिल तटकरे नाराज? घेतली शरद पवारांची भेट,चर्चा काय घडली?

अजित पवारांच्या मृत्यूनंतर पक्षात सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ आणि जय पवार यांचे वजन वाढत आहेत.

NCP News: राजकारणातील मोठी बातमी! सुनिल तटकरे नाराज? घेतली शरद पवारांची भेट,चर्चा काय घडली?
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगला येथे भेट घेतली
  • राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते
  • तटकरे यांनी शरद पवारांची तब्येत विचारण्यासाठी भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

राजकारणातील सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज मंगळवारी संध्याकाळी अचानक भेट घेतली. ही भेट पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली. जवळपास दहा ते बारा मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर तटकरे नाराज असल्याचं बोललं जात होतं. या भेटी मागे ही हेच कारण आहे का याची ही चर्चा सुरू झाली आहे. पण तटकरे यांनी याबाबत आपलं स्पष्टीकरण ही दिलं आहे.   

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीत सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव होते. पण त्यांच्या समोर कोणतेही पद नव्हते. ही बाब कोणाच्या ही नजरेतून सुटू शकली नाही. तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत तर पटेल हे कार्याध्यक्ष आहेत. अशा स्थितीत त्यांना समोरील हे पद गायब होतं. काल सोमवारी ही कार्यकारणी जाहीर झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तटकरे यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. तटकरेंचे भेटी टायमिंग पाहाता ते पक्षात नाराज आहे का अशीच चर्चा सुरू झाली आहे. 

नक्की वाचा - Trending News: ना कार, ना ताफा! पोलिस अधिक्षक सायकलने कार्यालयात, मोदींचा सल्ला पाळणारे हे अधिकारी कोण?

मात्र या चर्चा सुरू झाल्या असताना तटकरेंनी मात्र या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. शरद पवार हे आजारी असताना त्यांची भेट घेता आली नाही. ब्रिच कँडीमध्ये उपचार सुरू असताना ही पवार साहेबांना भेटायला जाता आला नाही असं तटकरे म्हणाले. त्यामुळे त्यांनी मंगळवारी संध्याकाळची वेळ दिली होती. त्यानुसार फक्त त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी आपण गेले होतो असे स्पष्टीकरण सुनिल तटकरे यांनी दिले आहे. या भेटीत कोणती ही राजकीय चर्चा झाली नाही असं ही ते म्हणाले. या भेटीचा कोणता ही चुकीचा अर्थ काढू नये. आम्ही सर्व जण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आम्ही एनडीएमध्येच आहोत असं सांगायला ही ते विसरले नाहीत. 

नक्की वाचा - Heat Alert: पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, तुमचा जिल्हा यात आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही ठिक आहे असं नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर पक्षात सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ आणि जय पवार यांचे वजन वाढत आहेत. पक्षावर ते सध्या घट्ट पकड निर्माण करत असताना दिसत आहेत. अशा वेळी पक्षावर सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा ताबा असल्याचं काही कार्यकर्त्याचं म्हणणं होतं. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीवर लक्ष टाकल्यानंतर पटेल आणि तटकरेंना योग्य तो संदेश दिला गेला आहे अशी चर्चा पक्षातच सुरू झाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com