2024 वर्ष ठरलं मैलाचा दगड, अदाणी ग्रुपच्या AGM मध्ये चेअरमन गौतम अदाणींनी केलं संबोधित 

Adani Enterprises 32nd AGM: अदाणी फाऊंडेशन साहस, विश्वास आणि उद्देशाप्रती कटीबद्धता या तीन मूलभूत सिद्धांतावर आधारित आहे, असा विश्वास यावेळी गौतम अदाणींनी व्यक्त केला.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

अदाणी एंटरप्रायजेसची (Adani Enterprises)  वार्षिक सर्वसाधारण बैठक आज (24 जुलै) पार पडली. आज 24 जून रोजी अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. या AGM मध्ये (Annual General Meeting)  अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी शेअरहोल्डर्सना (Gautam Adani) संबोधित केलं. 

अदाणी ग्रुपच्या AGM मध्ये चेअरमन गौतम अदाणी म्हणाले की, 2024 हे वर्ष अदाणी एंटरप्रायजेससाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. पुढे गौतम अदाणी म्हणाले, अपयशाचा सामना करण्याची क्षमता यशाचा खरा मापदंड आहे. मी माझ्या आईकडून आयुष्याचे धडे घेतले. मी बनासकांठाच्या वाळवंटात वाढलो आणि चिकाटीचं मूल्य शिकत गेलो. गेल्या वर्षात ही चिकाटी मोठ्या प्रमाणात दिसून आली. 

गेल्या वर्षी एका परदेशी शॉर्ट-सेलरने आमच्या सचोटी आणि प्रतिष्ठेवर केलेल्या हल्ल्याचा अदाणी समुहाने धैर्याने सामना केला. कोणतंही आव्हान अदाणी समूहाचा पाया कमकुवत करू शकत नाही हे आम्ही सिद्ध केलंय. गौतम अदाणी पुढे म्हणाले, अदाणी फाऊंडेशन साहस, विश्वास आणि उद्देशाप्रती कटीबद्धता या तीन मूलभूत सिद्धांतावर आधारित आहे. 

नक्की वाचा - 18 व्या लोकसभा अधिवेशनाला आजपासून सुरुवात, पहिल्या दिवशी खासदारांचे शपथविधी पार पडणार

गौतम अदाणी म्हणाले, 

  • FPO द्वारे 20,000 कोटी रुपये उभे केल्यानंतरही आम्ही ते परत करण्याचा निर्णय घेतला.  17,500 कोटींच्या  मार्जिन लिंक्ड कर्ज मुदतीआधीच परत केल्याने विश्वास पूर्ववत होण्यास मदत झाली.
  • आम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालो आहोत आणि आमचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन अद्याप बाकी आहे. हम ये करके दिखाएंगे!
  • अदाणी पॉवरची क्षमता 12 टक्क्यांनी वाढून ती आता 15,250 मेगावॅट झाली आहे.
  • अदाणी टोटल गॅसच्या सीएनजी पंपांची संख्या 900 पर्यंत पोहोचली आहे.
  • अदाणी टोटल गॅसने 606 ईव्ही चार्जिंग पॉईंटसची सुरुवात केली आहे.
  • 'खावडा' हरीत उर्जा प्रकल्पातून पुढील 5 वर्षांत 30 GW उर्जा निर्मितीचे ध्येय. 
  • धारावी प्रकल्प हा जगातील सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे 10 लाखांहून अधिक नागरिकांचे आयुष्य सुखकर होईल.   
  • अंबुजा, एसीसी, अदाणी पोर्ट, अदाणी एसईझेडला 'AAA' मानांकन मिळाले आहे. 
  • कच्छ कॉपर च्या ग्रीनफील्ड रिफायनिंग प्लँटमधून उत्पादनाला सुरुवात झाली आहे. या रिफायनरीला जगातील सगळ्यात मोठा प्लँट बनविण्याचे आमचे उद्दीष्ट्य आहे. 
  • एनडीटीव्हीच्या जागतिक डिजिटल ट्रॅफीकमध्ये 39 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
  • साहस, धैर्य आणि उद्दीष्टाप्रती  कटीबद्धता ही अदाणी समूहाची मूल्ये आहेत
  • FPO द्वारे 20,000 कोटी रुपये उभे केल्यानंतरही आम्ही ते परत करण्याचा निर्णय घेतला.  17,500 कोटींच्या  मार्जिन लिंक्ड कर्ज मुदतीआधीच परत केल्याने विश्वास पूर्ववत होण्यास मदत झाली. 
  • सरकारने पायाभूत सुविधांसाठीची वार्षिक तरतूद गेल्या 5 वर्षांत वाढवली आहे.
  • अदाणी समूहाच्या एकसंधतेवर, प्रतिष्ठेवर काही विदेशी शॉर्ट सेलर्सने हल्ले करण्याचे प्रयत्न केले, या हल्ल्यानंतरही अदाणी समूहाची वीट एक इंचही हलली नाही.


 

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)