जाहिरात

उत्तर प्रदेश आणखी उजळणार, ग्रीनफिल्ड प्रकल्पातून अदाणी पॉवर वीज पुरवठा करणार

औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे उत्तर प्रदेशात औष्णिक ऊर्जेची मागणी 2033-34 पर्यंत सुमारे 11,000 मेगावॅटने वाढण्याची शक्यता आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठीच्या उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांचा 1,500 मेगावॅटचा हा उर्जा निर्मिती प्रकल्प भाग आहे. 

उत्तर प्रदेश आणखी उजळणार, ग्रीनफिल्ड प्रकल्पातून अदाणी पॉवर वीज पुरवठा करणार
मुंबई:

उत्तर प्रदेश सरकारने 1500 मेगावॅट विजेच्या पुरवठ्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. अदाणी पॉवरने सगळ्यात कमी बोली लावत निविदा प्रक्रियेत बाजी मारली आहे. अदाणी पॉवर ही खासगी क्षेत्रातील भारतातील सगळ्यात मोठी औष्णिक वीज निर्मिती कंपनी आहे. या निविदेतील तरतुदींनुसार अदाणी पॉवर आता उत्तर प्रदेशला अत्यंत स्पर्धात्मक दराने म्हणजे 5.83 रुपये प्रति युनिट दराने वीज पुरवठा करेल. हा वीज पुरवठा करण्यासाठी 2x800 MW  क्षमतेचा ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ओन आणि ऑपरेट (DBFOO) मॉडेलवर उभारण्यात येणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने याच महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी आता दीर्घ काळासाठीचा वीज पुरवठा सहकार्य करार केला जाणार आहे. अदाणी पॉवर आणि उत्तर प्रदेशच्या वीज महामंडळ म्हणजे  UPPCL यांच्यात हा करार केला जाणार आहे. 

नक्की वाचा : अदाणी समुहाकडून भारतातले पहिले Hydrogen Powered ट्रक खाण वाहतुकीसाठी रवाना

अदाणी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एस.बी. ख्यालिया यांनी या निमित्ताने बोलताना म्हटले की, “उत्तर प्रदेश राज्याला 1,500 मेगावॅट वीज पुरवठा करण्यासाठी स्पर्धात्मक बोली जिंकल्याचा तसेच राज्याची वेगाने वाढणारी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची आम्हाला संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.  आम्ही उत्तर प्रदेशात एक आधुनिक आणि कमी उत्सर्जन करणारा अल्ट्रा-सुपरक्रिटिकल प्लांट उभारण्याची योजना आखत आहोत आर्थिक वर्ष 2030 पर्यंतया प्रकल्पातून वीज पुरवठा सुरू करण्याचे आमचे उद्दीष्ट्य आहे.” 

ख्यालिया यांनी पुढे म्हटले की,  अदाणी पॉवर हा प्रकल्प आणि त्यासाठीच्या संबंधित पायाभूत सुविधांसाठी सुमारे $2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. या प्रकल्पाच्या उभारणीच्या वेळीपासून सुमारे 8,000-9,000 जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकल्पामुळे आणखी 2,000 जणांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे. 

औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे उत्तर प्रदेशात औष्णिक ऊर्जेची मागणी 2033-34 पर्यंत सुमारे 11,000 मेगावॅटने वाढण्याची शक्यता आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठीच्या उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांचा 1,500 मेगावॅटचा हा उर्जा निर्मिती प्रकल्प भाग आहे. 

मागील एका वर्षात अदाणी पॉवर कंपनीने बोली जिंकत केलेला हा दुसरा मोठा करार आहे.  यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) कडून 6,600 मेगावॅट (1600 मेगावॅट औष्णिक आणि 5000 मेगावॅट सौर) चा एकत्रित LoI अदाणी पॉवरला प्राप्त झाला होता, ज्याचे नंतर वीज वितरण करारामध्ये रूपांतर झाले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com