दिवाळीचा उत्साह ओसरला असला तरी, आता घराघरांत लग्न-समारंभाची तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशांचा मंगलमय ध्वनी लवकरच ऐकू येईल. पण या आनंदी हंगामात ग्रहांची साथ मात्र फारशी मिळणार नाही, असे चित्र आहे.
ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिलेल्या 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, यंदा नोव्हेंबर 2025 ते जुलै 2026 या दरम्यान विवाहासाठी केवळ 49 दिवस आणि मुंजीसाठी अवघे 20 दिवस शुभकाळ आहे.
यावर्षी विवाहयोगासाठी ग्रह फारसे अनुकूल नसण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरूचा अस्त आणि शुक्राचा अस्त हे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या अस्ताच्या काळात विवाह करणे शुभ मानले जात नाही.
(नक्की वाचा- November Bank Holiday: नोव्हेंबर महिन्यातही बँकांना सुट्ट्या! किती दिवस राहणार बंद? पाहा सर्व यादी)
विवाहाचे शुभमुहूर्त
- नोव्हेंबर 2025 - 22, 23, 25, 26, 27, 30
- डिसेंबर 2025 - 2, 5
- फेब्रुवारी 2026- 6, 7, 10, 11, 12, 20, 21, 22, 25, 26
- मार्च 2026 - 5, 7, 8, 14, 15, 16
- एप्रिल 2026 - 21, 26, 28, 29, 30
- मे 2026 - 1, 3, 6, 8, 9, 10, 13, 14
- जून 2026- 19, 23, 24, 27
- जुलै 2026- 1, 3, 4, 7, 8, 11
मुंजीचे शुभमुहूर्त
- फेब्रुवारी 2026- 6, 19, 22, 26, 27
- मार्च 2026 - 8, 20, 29
- एप्रिल 2026 - 3, 8, 21, 22, 28
- मे 2026- 3, 6, 7, 8
- जून 202- 16, 17, 19