जाहिरात
This Article is From Mar 13, 2024

पत्नीच्या नावावर घर घेण्याचा मोठा फायदा, पैशांमध्येही होते बचत! वाचा सविस्तर

घर खरेदी करताना पैसे वाचवायचे असतील तर तुमची पत्नी किंवा घरातील अन्य महिलांच्या नावावर ते करणे हा सर्वात सोपा उपाय आहे.

पत्नीच्या नावावर घर घेण्याचा मोठा फायदा, पैशांमध्येही होते बचत! वाचा सविस्तर
मुंबई:

Home Buying Tips : एक बंगला बने न्यारा .... असं प्रत्येकाचं स्वप्न असतं... आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला वाटत असतं की साधं का होईना आपल्या स्वत:च्या मालकीचं घर असावं.  हीच घर खरेदी हुशारीनं केल्यास तुमच्या पैशांची तर बचत होतेच शिवाय अनेक योजनांचा लाभही घेता येतो ... तुम्हीं जर विवाहित असाल तर तुमच्या पत्नीच्या नावे नवी मालमत्ता खरेदी करणं फायदेशीर ठरू शकते. घर घेत असताना अधिक फायदा होत असेल, तर मग ती संधी का सोडायची?.... चला, आम्ही तुम्हांला सांगणार आहोत, तुमची नवी संपत्ती तुमच्या पत्नीच्या नावावर केल्यास नेमका काय आणि कसा फायदा होवू शकतो...

घर खरेदी करणं ही आर्थिकदृष्ट्या काहीशी क्लिष्ट आणि जोखमीची गुंतवणूक आहे आणि ते एकट्याने हाताळणे हे खूपच कठीण आणि तणावपूर्ण काम असू शकतं.  त्यामुळे अर्थतज्ज्ञ किंवा योग्य गुंतवणूकदाराची सांगड घालून व्यवहार केल्यास फायदेशीर ठरतं. अनेक जण आपल्या आयुष्यभराची कमाई घर खरेदीमध्ये गुंतवतात. या कमाईचा पूर्ण मोबदला मिळणे आणि त्यामध्ये बचत करण्याची एकही संधी न सोडणे हे महत्त्वाचे आहे. 

घर खरेदी करताना पैसे वाचवायचे असतील तर तुमची पत्नी किंवा घरातील अन्य महिलांच्या नावावर ते करणे हा सर्वात सोपा उपाय आहे.

यामुळे तुम्ही घरातील महिलेला बरोबरीचा दर्जा मिळतो. त्याचबरोबर तुमच्या खिशावरील ताणही कमी होतो. 

काय आहेत फायदे?

- महिलांच्या नावानं मालमत्ता खरेदी केल्यास गृहकर्जाच्या व्याजदरात सूट मिळते. अनेक गृहनिर्माण तसंच वित्तीय कंपन्या पुरुषांपेक्षा महिलांना कर्ज देताना प्राधान्य देतात.
- मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्क आकारले जाते. प्रत्येक राज्यांमध्ये हे शुल्क वेगवेगळे असते. पण, महिलांच्या नावावर घर असल्यास त्यामध्येही सूट मिळते.
- महिलांना घर खरेदी करताना करामध्येही सवलत असते. त्यामुळेही तुमच्या पैशांची मोठी बचत होते.
-प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत, महिलांना घर खरेदीदारांच्या पसंतीच्या वर्गात ठेवण्यात आलंय 

( स्पष्टीकरण : या बातमीमधील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV मराठी याची कोणतीही जबाबदारी घेत नाही.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Paytm Crisis: तुमच्या Paytm मध्ये काय फरक पडणार? कोणती सर्व्हिस होणार बंद
पत्नीच्या नावावर घर घेण्याचा मोठा फायदा, पैशांमध्येही होते बचत! वाचा सविस्तर
sukanya-samriddhi-yojana-ssy all-you-need-to-know-from-interest-rate-features-maturity
Next Article
तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी जबरदस्त योजना! बचतीच्या तिप्पट मिळेल परतावा