जाहिरात

Budget 2024 : सोनं, विमान प्रवास, पेट्रोल...; काय स्वस्त अन् काय महाग होणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आपला सातवा अर्थसंकल्प (Budget 2024 Update) सादर केला आहे. मात्र काय स्वस्त आणि काय महाग होणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं.

Budget 2024 :  सोनं, विमान प्रवास, पेट्रोल...; काय स्वस्त अन् काय महाग होणार?
नवी दिल्ली:

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आपला सातवा अर्थसंकल्प (Budget 2024 Update) सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र काय स्वस्त आणि काय महाग होणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. यंदा मोठ्या घोषणा करीत असताना अर्थमंत्री सीतारमण यांनी मोबाइल फोन स्वस्त करण्याची घोषणा केली. त्याशिवाय कॅन्सरची औषधं स्वस्त केली आहेत. लिथियम आयन बॅटरी स्वस्त करणार असल्याचं जाहीर केलं.यामुळे इलेट्रॉनिक वाहनं स्वस्त होऊ शकता.सोबतच इम्पोर्टेंड ज्वेलरी स्वस्त होणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. 

काय स्वस्त आणि काय महाग?

काय स्वस्त?

  • कॅन्सरच्या उपचाराच्या औषधांवरील कस्टम शुल्क कमी होणार
  • मोबाइल फोन, संबंधित पार्ट, चार्जरवरील सीमा शुल्क घटणार
  • एक्सरे ट्यूबवर सूट
  • मोबाइल फोन, चार्जरवरील ड्यूटी 15 टक्क्यांनी कमी
  • 25 महत्त्वाच्या खनिजांवर शुल्क नाही
  • फिश फीडवरील शुल्क घटले
  • देशात निर्मिती होणारे लेदर, कपडे आणि शूट स्वस्त होणार
  • सोनं, चांदीवरील सीमा शुल्क घटवून 6 टक्के 
  • प्लेटिनमवरील सीमा शुल्क घटवून 6.4 टक्क्यांपर्यंत

नक्की वाचा - Budget 2024 Live Updates : नव्या कर प्रणालीनुसार 'टॅक्स स्लॅब'मध्ये बदल


काय महाग?

  • प्लास्टिक सामानावरील आयात शुल्कात वाढ
  • पेट्रोकेमिकल-अमोनियम नायट्रेटवरील सीमा शुल्क वाढवले
  • पीवीसी-इंपोर्ट घटविण्यासाठी 10-25 टक्क्यात वाढ
  • विमान प्रवास महाग
  • सिगारेट पण महाग  

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील सात मोठ्या गोष्टी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील सात मोठ्या गोष्टी
* पहिल्यांदा नोकरी मिळालेल्यासाठी: जर पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर पहिल्यांदाच EPFO ​​मध्ये नोंदणी करणाऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत मिळेल.
* शैक्षणिक कर्जासाठी: ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना देशभरातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी कर्ज मिळेल. सरकार कर्जाच्या 3 टक्के रक्कम देईल. यासाठी ई-व्हाऊचर सुरू केले जातील, जे दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना दिले जातील.
* राज्यांसाठी विशेष योजना: बिहार आणि आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशला 15 हजार कोटी रुपये आणि बिहारला 41 हजार कोटी रुपयांची मदत. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष योजना.
* शेतकऱ्यांसाठी: सहा कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्ट्रावर आणली जाईल. 5 राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी केले जातील.
* तरुणांसाठी: मुद्रा कर्जाची रक्कम 10 लाखांवरून 20 लाख रुपये झाली. 500 टॉप कंपन्यांमध्ये 5 कोटी तरुणांना इंटर्नशिपचे आश्वासन.
* महिला आणि मुलींसाठी: महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद.
* सूर्य घर मोफत वीज योजना: 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज.

 
Previous Article
तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल
Budget 2024 :  सोनं, विमान प्रवास, पेट्रोल...; काय स्वस्त अन् काय महाग होणार?
MPs of Mahavikas Aghadi aggressive over no big announcements for Maharashtra in union budget 2024
Next Article
Budget 2024 : "महाराष्ट्रावर अन्याय केला", महाविकास आघाडीच्या खासदारांचं संसदेबाहेर आंदोलन