जाहिरात
14 days ago

आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Elections) मतदान पार पडणार आहे. दिल्लीच्या 70 विधानसभा मतदारसंघांसाठी हे मतदान घेतलं जाणार आहे. यंदा अरविंद केजरीवाल, आतिशी यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस, आप आणि भाजपमध्ये मुख्य लढत होणार आहे. आप पुन्हा दिल्लीवर सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार की भाजप दिल्लीचा किल्ला हलविण्यात यशस्वी ठरणार हे येत्या काही दिवसात समोर येईल. 

वाल्मीक कराडच्या बातम्या का पाहतोस? तरुणाला बेदम मारहाण, धनंजय देशमुख करण्याची धमकी

Walmik Karad Case : बीड जिल्ह्यातल्या धारुरमध्ये  वाल्मीक कराड याच्या संबंधित बातम्या पाहिल्याने तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. जखमी तरुणावर सध्या अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शंकर मोहिते असं या तरुणाचं नाव आहे. अशोक त्याच्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहत होता. या दरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी आमच्या बातम्या का पाहतोस?  असे म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली. तू येथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मीक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Live Update : नागपुरात पुन्हा Brid Flu चा प्रवेश, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

नागपुरात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं सिद्ध झाल्यानं बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांची तसेच निगडित खाद्य व अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत जलद कृती दलास आदेश देण्यात आले आहे. एक किलोमीटर त्रिज्येतील बाधित क्षेत्रातील परिसर निर्जंतुकीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. 

बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी अंडी पक्षीखाद्य खरेदी विक्री वाहतूक बाजार व जत्रा तसेच प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील 21 दिवसापर्यंत प्रतिबंध लावण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश दिले आहेत

Live Update : नागपुरात पुन्हा Brid Flu चा प्रवेश, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

नागपूरमधील मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे प्रतिबंधासह परिसर निर्जंतुकीकरणाचे आदेश दिले आहेत.  भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था आनंद नगर भोपाळ तसेच रोग अन्वेषण विभाग पुणे यांनी नागपूर येथील मोठा ताजबाग या परिसरातील कोंबड्यांचे नमुने एच 5 एन 1 या एव्हीयन इन्फ्लुएंझा ( बर्ड फ्लू) विषाणूसाठी पॉझिटिव्ह आढळून आल्याचे कळविले आहे. 

Live Update : पुण्यातील धक्कादायक प्रकार, तरुणांकडून कोयत्यानं 50-60 वाहनांची तोडफोड, Video

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. परिसरात दहशत माजावी म्हणून तरुणांनी कोयत्यानं वाहनांची तोडफोड केली. आज (बुधवार, 5 फेब्रुवारी) पहाटे पावणे तीन वाजता हा प्रकार घडला आहे. तोडफोड करणाऱ्या तीन्ही आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी 50 ते 60 वाहनांची तोडफोड केली आहे. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या तरुणांची धिंड काढली आहे. 

पाहा Video

Delhi Exit Poll Results 2025 Live Update : दिल्लीत भाजपाचं कमबॅक? 6 एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर

Delhi Exit Poll Results 2025: दिल्ली विधानसभेच्या 70 जागांवरील मतदान पूर्ण झालं आहे. या मतदानानंतर एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सहा एक्झिट पोलनं त्यांचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. या पोलमध्ये भाजपाच्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पोलनुसार दिल्लीत भाजपाला 35 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला 32-37 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Live Update : बदली की राजीनामा? तिरुपती मंदिरातील 18 गैर हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई

तिरुमला तिरुपती देवस्थानम, तिरुपती मंदिराच्या संचालक संस्थेनं मोठा निर्णय घेतला आहे. या संस्थेनं 18 गैर हिंदू कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. संस्थेनं या सर्व कर्मचाऱ्यांना बदली किंवा स्वेच्छा निवृत्ती याबाबतचा पर्याय निवडण्याचे निर्देश दिले आहेत. 

Live Update : राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर कादंबरीकार विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया

एखादा पीए किंवा एखाद्या प्राध्यापकाकडून वरवरचे माहिती घेऊन राजकारणी किंवा अभिनेते बोलतात; अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर कादंबरीकार विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटका करून घेताना लाच दिली होती असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आता त्यावर कादंबरीकार विश्वास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 महाराष्ट्रमध्ये अभिनेते असो किंवा  राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुरेसा अभ्यास किंवा प्राथमिक अभ्यास न करता काही बोलतात आणि त्यांच्या बोलण्यामुळे समाजामध्ये द्वेष भावना निर्माण होते किंवा दुही माजायची शक्यता असते हे टाळणं आवश्यक असल्याचा मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना साम दाम दंड या सर्व नितीचा वापर  केला होता. या घटनेला 360 वर्षे पूर्ण झालेले आहेत शिवाजी महाराजांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या छोट्याशा काळात जो पराक्रम घडवला तो महाराष्ट्राला त्याचे ताणेबाणे अजून ही  महाराष्ट्राला माहीत नाहीत कोणीतरी एखादा पीए किंवा एखाद्या प्राध्यापकाकडून वरवरचे माहिती घेऊन राजकारणी किंवा अभिनेते बोलतात हे त्यांनी असे बोलू नये शिवाजी महाराजांचा गांभीर्याने अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं असे त्यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

Live Update : नवी मुंबईत ट्रकच्या चाकाखाली येऊन लहान मुलाचा मृत्यू

नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 8 मध्ये भीषण अपघात घडला आहे. या घटनेत एक लहान मुलगा ट्रकच्या चाकाखाली आला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला आहे. बेलापूर आर्टिस्ट व्हिलेज येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या रोड मेंटेनन्सच्या कामासाठी अवजड वाहन आणले होते. याच वाहनाच्या चाकाखाली सेक्टर 8B मध्ये असलेल्या लहान मुलाचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह महापालिका वाशी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान सुरक्षा खबरदारीच्या अभावामुळे अशा घटना घडतात, असे स्थानिक नागरिक सांगत आहेत. 

या घटनेची तपासणी सुरू असून, यासंदर्भात पुढील कारवाईची माहिती अद्याप दिलेली नाही.

Live Update : कात्रज घाटात रिक्षा आणि डंपरची धडक

कात्रज घाटात रिक्षा आणि डंपरची धडक 

धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू 

१ जण गंभीर जखमी 

कात्रज घाटतील आताची घटना 

पोलीस घटनास्थळी दाखल झालेत पंचनामा केला जातोय

Live Update : सोलापुरकरांच्या पुण्यातील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होत. महाराजांच्या आग्रेच्या सुटकेवरून सोलापूरकर यांनी हे विधान केलं होत आणि त्यामुळे सर्वत्र एक संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतीये. अनेक आंदोलन राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Live Update : राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज पुतळ्याखाली नाक घासून माफी मागितली पाहिजे - शंभुराज देसाई

राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज पुतळ्याखाली नाक घासून माफी मागितली पाहिजे - शंभुराज देसाई

Live Update : कुंभमेळ्यातील संगमावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शाहीस्नान

कुंभमेळ्यातील संगमावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शाहीस्नान संपन्न...

Live Update : पुण्यात 75 हजार 'बहिणीं'कडे चारचाकी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकीवाल्या 'बहिणीं'ची यादी आली आहे. शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील 75 हजार 100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका 'बहिणीं'च्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. राज्य शासनाकडून प्रत्येक परिवहन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. या याद्यांनुसार प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन पडताळणी करणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठीच्या दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत.  

अशी आहे स्थिती

२१ लाख ११ हजार ९९१ एकूण अर्ज

२० लाख ८९ हजार ९४६ लाभ मिळालेल्या बहिणी

७५ हजार १०० चारचाकी वाहने असलेल्या बहिणी

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात दाखल...

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात दाखल...

Live Update : महाकुंभ स्नानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोटीने रवाना

महाकुंभ स्नानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोटीने रवाना

थोड्याच वेळात संगम घाटावर स्नान करतील

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजला पोहोचले, थोड्याच वेळात महाकुंभमध्ये पोहोचणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजला पोहोचले, थोळ्याच वेळात महाकुंभमध्ये पोहोचणार

Live Update : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन बोगदा कामाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र फडणवीसांचा हा दौरा राजकीय दृष्टया महत्वाचा समजला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि मुंडे विरुद्ध धस या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे यादेखील उपस्थित राहणार आहे. सोबतच धनंजय मुंडे यांना देखील आपण आमंत्रण दिलं असल्याचं सुरेश धस म्हणाले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार का हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे...

Live Update : चंद्रभागेच्या पाण्यात आळ्या किडे; भाविकांच्या आरोग्याला धोका

पंढरपूर येथील चंद्रभागेच्या पाण्यात अक्षरशः आळ्या आणि किडे झाले आहेत. अशा अशुद्ध आणि घाण पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे. चंद्रभागेच्या पाण्यात आळ्या झाल्याने चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यानिमित्ताने नामामी चंद्रभागा प्रकल्प देखील कागदावरच असलेला दिसून येतोय. माघी एकादशीचा सोहळा 8 फेब्रुवारी रोजी होत आहे. या माघी वारीच्या तोंडावर देखील  मैली झालेल्या चंद्रभागेत भाविकांना स्नान करावे लागत असल्याने वारकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे. 

Live Update : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात देवगड आणि रत्नागिरी हापूस दाखल

नवी मुंबई येथील एपीएमसी बाजारात हापूस आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे 325 पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत, त्यातील 95 %आंबे देवगड भागातील आहेत. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर, मिठमुंबरी आणि रत्नागिरीतील रेळे आणि पावस या भागातूनही आंब्याची आवक झाली आहे. 1 फेब्रुवारीला गणेश जयंतीच्या मुहूर्तावर 175 पेट्या दाखल झाल्या होत्या. सध्या देवगड हापूसच्या पेटीचा भाव 7 ते 12 हजार रुपये आणि रत्नागिरी हापूस 7 ते 10 हजार रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. 

बदलत्या वातावरणामुळे आंब्याचा मोहोर काळा पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याची आवक कमी राहणार असल्याचे एपीएमसी व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितलं. त्यामुळे यंदा हापूस आंब्याची चव चाखताना सर्वसामान्यांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे.

Live Update : श्वेता सिंघल अमरावतीच्या नव्या विभागीय आयुक्त..

अमरावती विभागीय आयुक्त पदी श्वेता सिंघल यांची शासनाने नियुक्ती केली आहे, त्या 2009 च्या सिव्हिल सर्विस  बॅचमध्ये सतराव्या रँक धारक आहेत. या यापूर्वी श्वेता सिंघल यांनी राजभवनात सचिव  व सातारा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले, यापूर्वीच्या विभागीय आयुक्त निधी पांडे या 26 डिसेंबर 2024 पासून  रजेवर आहेत तर आता श्वेता सिंघल ह्या अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त असतील. 

Live Update : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड 

तीन आरोपींकडून बिबवेवाडी परिसरातील अनेक भागांमध्ये 50 हून अधिक गाड्यांची करण्यात आली तोडफोड 

अप्पर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, अपर डेपो या परिसरात काल रात्री आरोपींकडून गाड्यांची तोडफोड 

याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पुणे पोलिसांनी घेतल ताब्यात 

पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Live Update : चंद्रपूरमध्ये जीबीएसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणेच दुर्लक्ष

12 वर्षीय मुलीला गुलियन बेरी सिंड्रोम (GBS) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या मागील महिनाभरापासून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील चेक ठाणे वासना गावातील घटना. आजार शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि उपचार खर्चिक असतात. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला या प्रकाराची माहितीच नसल्याचे समोर आले असून, यंत्रणेकडून गोपनीयता पाळली जात आहे. राज्यभरात जीबीएसचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत 169 मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर चंद्रपुर जिल्ह्यातही जीबीएस चा शिरकाव झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

Live Update : मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केली याचिका

निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मंत्री धनंजय मुंडे व इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश 

मुंडेंनी शपथपत्रात अनेक बाबी दडवल्याचा याचिकेत आरोप

मुंडेंविरोधातील निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी

Live Update : पंतप्रधान मोदी आज कुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमावर स्नान करणार

पंतप्रधान मोदी आज कुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमावर स्नान करणार, दिल्ली विधानसभा मतदान मुहुर्त साधण्यावर विरोधकांची टीका

Live Update : राक्षेला पराभूत सिद्ध करून एक कोटी मिळवा, प्रशिक्षक रणवीर पोंगल यांचे आव्हान

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादीवरील अंतिम कुस्तीत पैलवान पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांची कुस्ती चितपट झालेली नाही. आक्षेप घेऊनही तो मान्य न करता राक्षेला पराभूत घोषित केले. मुळात व्हिडिओ रिप्ले दाखवूनच निर्णय अपेक्षित होता असे शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा नियम सांगता, मग या कुस्तीचा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवून त्यांच्याकडून शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध करा, एक कोटी रुपयांचे चॅलेज देतो असे पोंगल म्हणाले. शिवराज राक्षेनेही न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: