जाहिरात

EXCLUSIVE: करमुक्तीसाठी 12 लाखाचाच आकडा का? निर्मला सीतारमण यांनी सांगितलं 'अर्थकारण'

Nirmala Sitharaman Exclusive ON NDTV: छप्परफाड बजेटनंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. एनडीटीव्हीचे नेटवर्कचे संपादक  संजय पुगलिया यांनी घेतलेल्या या मुलाखतीत निर्मला सीतारमण यांनी बजेटबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले.

EXCLUSIVE: करमुक्तीसाठी 12 लाखाचाच आकडा का? निर्मला सीतारमण यांनी सांगितलं 'अर्थकारण'

Nirmala Sitharaman EXCLUSIVE: आगामी आर्थिक वर्ष  2025-26 चा अर्थसंकल्प् 1 फेब्रुवारी रोजी सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत देशाचे बजेट मांडले. या अर्थसंकल्पात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, ज्यामुळे मध्यमवर्गियांंना मोठा फायदा होणार आहे. या छप्परफाड बजेटनंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. एनडीटीव्हीचे नेटवर्कचे संपादक  संजय पुगलिया यांनी घेतलेल्या या मुलाखतीत निर्मला सीतारमण यांनी बजेटबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले. तसेच 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्ती करण्याच्या मोठ्या निर्णयामागची भूमिका आणि उद्देशही स्पष्ट केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?

'या बजेटमधून आपल्याला काय मिळाले? याबाबत मध्यमवर्गीयांमध्ये चर्चा होत आहे. आमचे नेहमी प्रत्येक क्षेत्रातील लोकांवर असते. यावेळी आम्ही पाहिले की कमीत कमी 1 लाख रुपये कमवणाऱ्या लोकांची जीवनशैली कशी असते? हे लोक कसे जगतात. कोणत्या प्रकारची जीवनशैली जगतात? याचा अभ्यास केला. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही महिन्याला १ लाख रुपये कमावऱ्यांना सुट देण्याचा निर्णय घेतला..' असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. 

"भारताची मूलभूत तत्त्वे आज चांगली आहेत आणि यासाठी पंतप्रधान मोदी बऱ्याच काळापासून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ते आपल्याला मूलभूत तत्त्वे मजबूत करण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी त्यात हा पैलू देखील समाविष्ट केला आहे की आपल्या मध्यमवर्गासाठी जो आपले करदाते आहे, आपल्याला आवश्यक आहे. काहीतरी करायला हवे पण काय करायचे हा प्रश्न होता. त्यांनी आम्हाला यावर काम करण्यास सांगितले, असंही त्यांनी सांगितले. 

नक्की वाचा - Union Budget 2025: शेतकरी ते AI.. बजेटमधून कुणाला काय मिळालं? वाचा 10 मोठ्या घोषणा

दरम्यान, आम्ही सुरुवातीपासूनच मध्यमवर्गीयांची काळजी घेण्याचे ठरवले होते. अर्थसंकल्पात नेहमीच गरिबांवर जास्त लक्ष केंद्रित केले गेले आणि मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष केले जात होते, परंतु यावेळी त्यांच्यावरही लक्ष केंद्रित केले आहे, असेही अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या. या बजेटनंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल.. असा विश्वासही यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.