जाहिरात

Union Budget 2025 : 'यंदाच्या अर्थसंकल्पावर बिहार निवडणुकीची छाप'; टीकेला अर्थमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर

Union Finance Minister Nirmala Sitharaman : 'नियमित आणि प्रामाणिक करदात्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात होता.'

Union Budget 2025 : 'यंदाच्या अर्थसंकल्पावर बिहार निवडणुकीची छाप'; टीकेला अर्थमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी NDTV चे एडिटर इन चीफ संजय पुगलिया यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांची मुलाखत घेतली. यावेळी अर्थमंत्री अर्थसंकल्प निर्मितीच्या प्रकियेविषयी बोलल्या. NDTV ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, नियमित आणि प्रामाणिक करदात्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आम्ही करदात्यांना सर्टिफिकेटही पाठवतो. आम्ही सुरुवातीपासून करदात्यांसाठी बऱ्याच गोष्टी करीत होतो. जगाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था पुढे आहे. भारताची अर्थव्यवस्था पुढील वर्षीही जलद गतीने वाढत राहील. अशावेळी प्रामाणिक करदात्यांसाठी आपण काय करू शकतो? हा विचार लक्षात ठेवून आम्ही काम केलं. याचा परिणाम म्हणजे 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्ती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, हा लोकांचा अर्थसंकल्प आहे. मी त्यात अधिक भर घालण्याचं साहस करते. अब्राहम लिंकन यांच्या शब्दात सांगायचं झालं तर लोकांनी लोकांसाठी तयार केलेला लोकांचा अर्थसंकल्प आहे. 

Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसली मधुबनी आर्टची साडी, पद्मश्री दुलारी देवींकडून मिळालीये भेट

नक्की वाचा - Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसली मधुबनी आर्टची साडी, पद्मश्री दुलारी देवींकडून मिळालीये भेट

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये बिहारसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा...

  1. बिहारमध्ये मखानाचे उत्पादन आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी मखाना बोर्ड स्थापन केलं जाईल.
  2. उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांचे राष्ट्रीय अभियान सुरू केले जाईल
  3. बिहारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेची स्थापना केली जाईल
  4. पाटणा विमानतळाचा विस्तार करण्याची घोषणा देखील केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.