जाहिरात

Gold Silver Price : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, लेटेस्ट दर पाहा

चांदी जवळपास १९ हजारांनी स्वस्त झाली आहे, सोन्याची किंमत कितीने कमी झाली, पाहा...

Gold Silver Price : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, लेटेस्ट दर पाहा
सोनं-चांदी किती रुपयांनी स्वस्त झालं?

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Gold and Silver Price Today : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. १ जानेवारीच्या सकाळी जळगावात सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी विना जीएसटी १ लाख ३३ हजार ५०० रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला सोन्याची खरेदी करणाऱ्यांची 'चांदी' असल्याचं चित्र आहे. 

सोन्यासह चांदीचे भावही घसरले...

नववर्षाच्या पहिल्या दिवशी जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव विना जीएसटी १ लाख ३३ हजार ५०० रुपयांवर घसरले आहेत. अडीच लाखांचा टप्पा पार केलेल्या चांदीचे भाव विना जीएसटी २ लाख ३६ हजार रुपयांवर आहेत. वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याचे भाव १ लाख ४० हजार तर चांदीचे भाव २ लाख ५४ हजार रुपये या विक्रमी स्तरावर पोहोचले होते. मात्र आठवड्याभरात सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याने आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

Silver : ऐतिहासिक झेप! चांदी 2.50 लाखांच्या पार; अचानक कशी झाली वाढ? पुढे चांदी गडगडणार की....

नक्की वाचा - Silver : ऐतिहासिक झेप! चांदी 2.50 लाखांच्या पार; अचानक कशी झाली वाढ? पुढे चांदी गडगडणार की....

सोनं आणि चांदी किती रुपयांची स्वस्त?

२४ कॅरेट सोन्याचे आजचे भाव (जीएसटी शिवाय) - १,३३,२००
जीएसटीसह - १,३७,१९६
(गेल्या वर्षीच्या तुलनेत १ जानेवारी २०२६ रोजी सोनं जवळपास ६,८०० रुपयांची स्वस्त झालं आहे.)

चांदीचे भाव  (जीएसटी शिवाय) - २,३५, ०००
जीएसटीसह - २,४२,०५०
(गेल्या वर्षीच्या तुलनेत १ जानेवारी २०२६ रोजी चांदी जवळपास १९ हजारांनी स्वस्त झाली आहे )

अचानक सोनं-चांदीचे दर का घसरले?

तज्ज्ञांनुसार, आंतरराष्ट्रीय तणावादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता त्यावर नियंत्रण येत असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या संकेतांनुसार, बाजारचा मूड बदलला आहे. ज्यामुळे सोनं-चांदीच्या दरवाढीवर नियंत्रण आलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com