जाहिरात

दिवाळीआधीच ग्राहकांचं 'दिवाळं' निघणार! सोन्या-चांदीचे दर पुन्हा कडाडले, 181000 रुपयांवर मारली मजल!

दिवाळीआधीच ग्राहकांचं 'दिवाळं' निघणार! सोन्या-चांदीचे दर पुन्हा कडाडले, 181000 रुपयांवर मारली मजल!
Today Gold And Silver Rate

Today Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं होतं. गुड्स रिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, चांदीचे प्रति किलोग्रॅमच्या भावात 10 हजार रुपयांची वाढ झाली होती. म्हणजेच चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 165000 रुपयांवर पोहोचले होते. अशातच आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल झाल्याचं समोर आलं आहे. आज 11 ऑक्टोबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची विक्री किंमत 123500 रुपयांवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 122500 रुपये झाली आहे.आज चांदीच्या किंमतीही गगनाला भिडल्याचं पाहायला मिळतंय. आज चांदीच्या प्रति किलोग्रॅमची विक्री किंमत 18100 रुपयांवर पोहोचली आहे. 

सोन्या-चांदीचे आजचे दर काय? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

नागपूरच्या सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या दरानुसार, आज शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची विक्री किंमत 123500 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची विक्री किंमत 1,14,900, 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची विक्री किंमत 96,300 आणि 14 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची विक्री किंमत 80,300 रुपये झाली आहे.v

नक्की वाचा >> छोटा राजनचा राईट हँड, दाऊद इब्राहिमचा कट्टर दुश्मन..कुख्यात गँगस्टर डीके राव आहे तरी कोण?

तर दुसरीकडे, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 1,22,500, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 1,12,900, 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 94300 आणि 14 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची खरेदी किंमत 78,300 रुपयांवर पोहोचली आहे. तसच चांदीच्या प्रति किलोग्रॅमच्या किंमतीत 16000 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीची प्रति किलोग्रॅमची किंमत 181000 रुपयांवर पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीने सर्व रेकॉर्ड मोडल्याचं समोर आलं आहे.याआधी चांदीचा फिफ्टी डॉलरचा रेकॉर्ड होता. पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात तो विक्रम मोडला आहे. आंरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात असलेल्या चांदीचे भाव भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. चांदीमध्ये आलेल्या तेजीमुळे मार्केटमध्ये उलथापालथ सुरु आहे. गुंतवणूकदारांसाठी हे एक चांगलं संकेत असल्याचं म्हटलं जात आहे. 

नक्की वाचा >> फक्त 5 कोटींचा बजेट! पण कमाई 120 कोटींची..2025 चा 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा वीकेंडला पाहायला अजिबात विसरू नका

Listen to the latest songs, only on JioSaavn.com