लग्नसराईत सोन्याचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीती मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा एप्रिल वायदा भाव प्रति 10 ग्रॅमवर 900 रुपयांपेक्षा जास्त वाढून 91,065 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठ्या वाढीची नोंद झाली आहे. मार्चमध्ये सोन्याचा वायदा भाव प्रति तोळे 4736 रुपयांनी वधारला. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे ट्रेडर्समध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवरील सोन्याच्या वायद्यांनी प्रति औंस 3,177 डॉलरचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. सध्या, कॉमेक्सवरील जून महिन्यातील सोन्याचे वायदे प्रति औंस 3158 वर व्यवहार करत आहेत. त्यात 8 डॉलरची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते, 1 एप्रिल रोजी सकाळी वाजता सोन्याचा भाव 89,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
(नक्की वाचा- Ready Reckoner : घराचं स्वप्न महागणार, रेडिरेकनरच्या दरात वाढ)
कोणत्या शहरात सोन्याचा दर किती?
- मुंबई - 89,170 रुपये प्रति/तोळे
- दिल्ली- 89,020 रुपये प्रति/तोळे
- कोलकाता - 89,050 रुपये प्रति/तोळे
- बंगळुरू - 89,240 रुपये प्रति/तोळे
- चेन्नई- 89,430 रुपये प्रति/तोळे
(नक्की वाचा - New Rules: UPI ते GST.. 1 एप्रिलपासून 'हे' 10 नियम बदलणार, तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार?)
सोन्याचे भाव का वाढत आहेत?
सोन्याच्या किमतीत वाढ होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे 2 एप्रिलपासून अमेरिकेकडून समसमान कर आकारणी आहे. कर वाढल्यामुळे महागाईही वाढेल. अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत. सोने कमी व्याजदराच्या वातावरणात चांगले परतावे देते.