जाहिरात

Gold Rate : सोन्यामध्ये विक्रमी वाढ, कितीने वाढलं? दिवाळीपर्यंत सोनं किती महाग होणार? 

Gold Price Diwali : ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत तुफान वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Gold Rate : सोन्यामध्ये विक्रमी वाढ, कितीने वाढलं? दिवाळीपर्यंत सोनं किती महाग होणार? 
मुंबई:

सण-उत्सवांचा सीजन सुरू होताच बुलियन मार्केटमध्ये पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारापासून देशांतर्गत बाजारापर्यंत सर्वच ठिकाणी तेजी (Gold Rate hike) पाहायला मिळत आहे. COMEX वर सोन्याचा दर विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे.  एमसीएक्सवर सोन्याचे भाव 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर चांदीचा भावही झपाट्याने 87700 रुपये प्रति किलोच्या वर जात आहे.

दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव कितीपर्यंत जाईल?
HDFC सिक्युरिटीचे अनुज गुप्ता यांनी सांगितलं की, दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळेल. दिवाळीपर्यंत सोनं 75,000 - 78,000 पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदींच्या दरात 90,000-95,000 किलोग्रॅमपर्यंत दर पोहोचू शकतात. केडिया एडव्हायजरीचे अजय केडिया यांनी सांगितल्यानुसार, दिवाळीपर्यंत सोनं 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,000 रुपये प्रतिकिलोग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. 

Ayushman Bharat : मोदी सरकारचा मोठा निर्णय, 70 वर्षांवरील नागरिकांना होणार फायदा

नक्की वाचा - Ayushman Bharat : मोदी सरकारचा मोठा निर्णय, 70 वर्षांवरील नागरिकांना होणार फायदा

 
ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याला झळाळी...
ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत तुफान वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॉमैक्सवर गुरुवारी सोनं 45 डॉलरने वाढलं होतं. सोन्याचे दर 2,568 डॉलर इतक्या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचले आहेत.   आज सकाळी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सध्या सोनं 2600 डॉलरच्या जवळपास ट्रेड करीत आहे. असंच सुरू राहिलं तर आगामी काळात सोन्यात मोठी वाढ होऊ शकते. चांदीचे दरही दोन टक्क्यांच्या मजबुतीसह दोन आठवड्याच्या सर्वाधिक दरात आहे.  


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com