Gold Rate Today: दसरा कसा होईल हसरा ? सोन्या-चांदीचे दर ऐकून तोंडचे पाणी पळाले

जागतिक आर्थिक अस्थिरता, उच्च महागाई आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढलेली मागणी ही या दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत असताना, मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय सराफा बाजारपेठेत सोन्याने नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. आज सकाळी 10:15 वाजता जाहीर झालेल्या Gems and Jewellery Council आणि नागपूर सराफाने शिफारस केलेल्या दरानुसार, 10 ग्रॅम स्टँडर्ड 24 कॅरेट सोन्याचा विक्री दर 1,17,000 रुपये इतका नोंदवला गेला आहे.

जागतिक आर्थिक अस्थिरता, उच्च महागाई आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढलेली मागणी ही या दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत.

(नक्की वाचा- Mumbai Local: नॉन-एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांचा प्रयोग यशस्वी! कशी असेल नवी लोकल? पाहा VIDEO)

30 सप्टेंबर 2025 चे प्रमुख दर (प्रति 10 ग्रॅम)

  • 24 कॅरेट सोने 1,17,000 रुपये
  • 22 कॅरेट सोने 1,08,800 रुपये
  • 18 कॅरेट सोने (750) 91,300 रुपये
  • 14 कॅरेट सोने 76,100 74 रुपये

चांदी आणि प्लॅटिनमचे दर

  • चांदी विक्री दर : 1,45,900 रुपये (प्रति 1 किलो)
  • प्लॅटिनम दर : 49,000 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि लगेच समस्या सोडवा )

'मेकिंग चार्जेस' आणि 'जीएसटी' अतिरिक्त

सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर वरील दरांव्यतिरिक्त मेकिंग चार्जेस, हॉलमार्क चार्जेस आणि जीएसटी (GST) अतिरिक्त लागू असतील. मेकिंग चार्जेस हे किमान 13% आणि त्याहून अधिक असावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे. सोन्याच्या दरातील ही विक्रमी वाढ गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक असली, तरी सामान्य ग्राहकांसाठी दागिने खरेदी करणे अधिक महाग झाले आहे.

Topics mentioned in this article