राज्यातील वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बाईक टॅक्सी (Bike Taxi) फायदेशीर ठरू शकते. पुण्यात रेपिडो कंपनीने सुरू केलेल्या बाईक टॅक्सीवर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थगिती आणण्यात आली होती. दरम्यान प्रवाशांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
परिणामी रॅपिडो, ओला, उबर आदी अॅप आधारित प्रवाशी सेवा देणाऱ्या कंपन्यांचा मुंबई महानगर प्रदेशासह, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश तसेच अन्य मोठ्या शहरात बाइक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नक्की वाचा - घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आयुक्त कैसर खालिद निलंबित, गृह विभागाची मोठी कारवाई
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने या बाईक टॅक्सीला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने बाईक टॅक्सीबाबत एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची अहवाल आणि बाईक टॅक्सी योजनेचा अभ्यास करून राज्यातील सर्व शहरांमध्ये अॅप आधारित बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सादर केला होता. त्यामुळे आता बाईक टॅक्सीला मान्यता मिळाली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा गर्दी असलेल्या शहरांमध्ये प्रवाशांना कमी खर्चात आणि कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world