जाहिरात

Indian Economy : भारत 2025 मध्ये चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार : IMF रिपोर्ट

भारताची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा टप्पा गाठू शकते. यावेळी जीडीपीचा आकार 5069.47 अरब डॉलर असू शकतो.

Indian Economy : भारत 2025 मध्ये चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार : IMF रिपोर्ट

Indian Economy : भारत 2025 मध्ये जपानला पिछाडीवर टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. IMF ने जारी केलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूक एप्रिल 2025 मधून ही माहिती समोर आली आहे. अहवालात असं म्हटले आहे की, 2025 मध्ये भारताचा नॉमिनल जीडीपी 4,187.017 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल. त्याच वेळी, जपानच्या जीडीपीचा आकार 4,186.431 अब्ज डॉलरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारत सद्यस्थितीला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जीडीपीमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाय हे देश भारताच्या पुढे आहेत. IMF च्या अंदाजानुसार, भारत येणाऱ्या काही वर्षात जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोटी अर्थव्यवस्था बनू शकतो. 

(नक्की वाचा-  Mobile App : हे 5 सरकारी अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)

भारताची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा टप्पा गाठू शकते. यावेळी जीडीपीचा आकार 5069.47 अरब डॉलर असू शकतो. तर 2028 पर्यंत भारताच्या जीडीपीचा आकार 5,584.476 अरब डॉलर असू शकतो. तर या काळात जर्मनीच्या जीडीपीचा आकार 5,251.928 अरब डॉलर राहण्याचा अंदाज आहे.  IMF च्या अंदाजानुसार, जगातील सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीन येणारी 10 वर्षे आपलं स्थान कायम राखतील. 

आयएमएफने 2025 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.2 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. जानेवारीच्या आउटलुक अहवालात याआधी हा आकडा 6.5 टक्के होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ  निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे विकास दरात घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे IMF च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. पुढील दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था एकमेव असेल जी 6 टक्क्यांच्या वेगाने वाढेल. 

(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

"IMF च्या एप्रिल 2025 च्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकमध्ये जागतिक विकासदर 2.8 टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. ज्यामध्ये 127 देशांमध्ये विकासदर घसरून जागतिक जीडीपीच्या 86 टक्के राहिल", असं IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com