- 26 जानेवारी रोजी बँक बंद
- डिजिटल बँकिंगवर कोणताही परिणाम नाही
- मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंगद्वारे व्यवहार करू शकता
Bank Holiday Alert: येत्या काही दिवसांत तुमचे बँकेशी संबंधित काही काम असल्यास किंवा तुम्ही बँकमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी वर्ष 2026मधील बँकेच्या सुट्यांची यादी एकदा नक्की पाहा. जेणेकरून तुमची बँकेमध्ये जाण्याची फेरी फुकट जाणार नाही. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार 2026मध्ये खूप सुट्या असणार आहेत. विशेषतः जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सलग काही दिवस बँका बंद राहणार आहेत.
पुढील 7 दिवस काय परिस्थिती असणार आहे?
जानेवारी महिना सण तसेच राष्ट्रीय सुट्यांनी भरलेला आहे. त्यामुळे बँका कधी सुरू आणि कधी बंद असणार? याबाबत माहिती जाणून घेऊया...
- 24 जानेवारी: महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद.
- 25 जानेवारी: रविवार – साप्ताहिक सुटी.
- 26 जानेवारी: प्रजासत्ताक दिन (Republic Day 2026) – राष्ट्रीय सुटी.
म्हणजेच 24 जानेवारी ते 26 जानेवारीदरम्यान अनेक राज्यांमध्ये सलग 3 दिवस बँका बंद असू शकतात.
वर्ष 2026मधील देशभरातील प्रमुख सुट्या
वर्ष 2026मध्ये बँक सुट्यांची यादी बर्यापैकी मोठी आहे
- होळी: 3 मार्च (मंगळवार)
- गुड फ्रायडे: 3 एप्रिल (शुक्रवार)
- स्वातंत्र्य दिन: 15 ऑगस्ट (शनिवार)
- दसरा: 20 ऑक्टोबर (मंगळवार)
- दिवाळी: 8 नोव्हेंबर (रविवार)
- ख्रिसमस: 25 डिसेंबर (शुक्रवार)
(नक्की वाचा: Silver Rate Today: चांदी 10 लाख रुपयांचा टप्पा गाठणार? दरवाढीमागे तिसरं महायुद्ध भडकण्याची भीती? तज्ज्ञ काय म्हणाले)
डिजिटल बँकिंगवर कोणताही परिणाम नाहीनागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. बँका बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा सुरूच राहणार आहेत. मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही व्यवहार करू शकता. तसेच रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमची सुविधा उपलब्ध असेल. फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमसारख्या अॅप्सद्वारे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
