Gold Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात आज बुधवार, २३ जुलै रोजी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम एक लाखाचा टप्पा ओलांडल्यामुळे खरेदीदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तर चांदी आणि प्लॅटिनमचे दरही वधारले आहेत. जीजेसी (GJC) आणि नागपूर सराफा यांनी शिफारस केलेल्या दरानुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,००,९०० रुपये प्रति तोळे आहे.
तर २२ कॅरेट सोन्याचा दर ९३,८०० रुपये प्रतितोळे आहे, १८ कॅरेट सोन्याचा दर ७८,७०० रुपये प्रतितोळे आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा दर ६५,६०० रुपये प्रतितोळे आहे. आज चांदीचा दर प्रति किलोग्राम १,१६,७०० रुपये इतका नोंदवला गेला आहे.
( नक्की वाचा: गुंतवणूक करण्याचे 4 बेस्ट पर्याय, तज्ज्ञ काय सांगतात एकदा पाहाच )
या दरांमध्ये मेकिंग चार्जेस म्हणजेच घडणावळ शुल्क, हॉलमार्क चार्जेस आणि जीएसटी (GST) यांचा समावेश नाही, ते अतिरिक्त असतील. मेकिंग चार्जेस किमान १३ टक्के किंवा त्याहून अधिक असू शकतात, असेही सराफा व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ प्रत्यक्षात ग्राहकांना दागिने खरेदी करताना नमूद केलेल्या दरांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतील.
( नक्की वाचा: बँक FD पेक्षा जास्त व्याज, गुंतवणूकही सुरक्षित; दरमाह मिळतील चांगले पैसे )
जागतिक बाजारातील घडामोडी, आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचे भाव, तसेच भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य यासारख्या अनेक घटकांवर सोन्या-चांदीचे दर अवलंबून असतात. सध्याच्या वाढत्या दरामागे जागतिक स्तरावरील आर्थिक अनिश्चितता आणि सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, ही प्रमुख कारणे असू शकतात. सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.