जाहिरात

Jumped Deposit Scam: UPI पिन टाकताच रिकामं होईल अकाऊंट, NPCI ने दिलं स्पष्टीकरण

Jumped Deposit Scam: जंप्ड डिपॉझिट स्कॅमबाबत काही अफवा देखील पसरल्या होत्या. त्यामुळे UPI वापरकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Jumped Deposit Scam: UPI पिन टाकताच रिकामं होईल अकाऊंट, NPCI ने दिलं स्पष्टीकरण
Jumped Deposit Scam

डिजिटल युगात टेक्नोलॉजीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. या सोबत सायबर गुन्हेगार देखील फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अवलंब करत आहेत. यूपीआय भारतात डिजिटल पेमेंटचा सर्वाधिका वापरला जाणारा सोपा पर्याय आहे. त्यामुळे यूपीआय वापरकर्त्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगली नाही तर मोठं नुकसान होण्याची भीती असते. सध्या जम्प्ड डिपॉझिट स्कॅम (Jumped Deposit Scam) नावाने होणाऱ्या फसवणुकीचा प्रकार चर्चेत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

सायबर गुन्हेगार UPI वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी नवीन पद्धती वापरत आहेत. अनेकदा ते तुमच्या बँक खात्यात काही पैसे पाठवतात. तुमच्या बँक खात्यात पैसे आल्यावर चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत, यावर तुमचा सहज विश्वास बसतो. अशा प्रकारे तुमच्यासाठी ते सापळा रचतात. त्यानंतर हे फसवणूक करणारे तुम्हाला पैसे परत करण्यासाठी अनेकदा रिक्वेस्ट पाठवतात.

(नक्की वाचा-  Torres Company : टोरेस प्रकरणात भारतीयांचे 200 कोटी परदेशात पाठवले? 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी)

त्यासाठी अनेकदा ते लिंक पाठवतात. त्यानंतर तुमच्या UPI ॲपमध्ये लॉग इन करण्याऐवजी तुम्ही त्यांनी दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करता आणि  पैसे पाठवण्यासाठी तुमचा UPI पिन टाकता. त्यानंतर ते तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतात.

तामिळनाडू पोलिसांनी जंप्ड डिपॉझिट स्कॅमबाबत अलर्ट जारी केला होता. या स्कॅममध्ये  सायबर गुन्हेगार आधी काही पैसे कोणाच्या तरी खात्यात ट्रान्सफर करतात. यानंतर ते लगेच त्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे पाठवण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतात. पैसे मिळाल्यानंतर, लोक सहसा त्यांचे बँक खाते तपासण्यासाठी त्यांचे UPI ॲप उघडतात. त्यानंतर पिन टाकताच फसतात. पैसे काढण्याची रिक्वेस्ट अप्रुव्ह होते आणि त्यांच्याकडून खात्यातून पैसे काढले जातात.

(नक्की वाचा - Bangladesh Illegal migration : बांगलादेशींनी राज्यभर हात-पाय पसरले, कोकणातून धक्कादायक प्रकार उघड)

NPCI चे स्पष्टीकरण 

जंप्ड डिपॉझिट स्कॅमबाबत काही अफवा देखील पसरल्या होत्या. त्यामुळे UPI वापरकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यावर National Payments Corporation of India स्पष्टीकरण देत सांगितलं की, केवळ UPI किंवा बँक अॅप ओपन केल्याने ट्रान्जॅक्शन ऑटोमोटिव्ह अप्रुव्ह होत नाही. ट्रान्जॅक्शन करण्यासाठी वापरकर्त्याला पेमेंट रिक्वेस्टवर नेव्हिगेट करावं लागतं. UPI पिनसह ऑथराईज करण्यासाठी Pay ऑप्शनवर क्लिक करावं लागतं. या स्टेप्शशिवाय पेमेंट होणार नाही.

कुणीही थेट वापरकर्त्याच्या अकाऊंट पैसे काढण्यासाटी रिक्वेस्ट करु शकत नाही.  UPI ही एक डिव्हाईस बेस्ड पेमेंट सिस्टम आहे. म्हणजेच वापरकर्त्याच्या नोंदणीकृत नंबरशी आणि त्यांच्या विशिष्ट मोबाइल डिव्हाइसशी सुरक्षितपणे जोडलेले आहे. फक्त वापरकर्ताच व्यवहार किंवा पैसे काढू शकतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: